Home | International | Other Country | barack obama in scam

बराक ओबामा घोटाळ्यात अडकणार!

agency | Update - May 30, 2011, 05:55 AM IST

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा लवकरच एका घोटाळ्यात अडकतील, असा दावा अमेरिकेच्या राजकीय विश्लेषकानेकेला आहे

  • barack obama in scam

    लंडन - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा लवकरच एका घोटाळ्यात अडकतील, असा दावा अमेरिकेच्या राजकीय विश्लेषकानेकेला आहे. ओबामा प्रशासन लवकरच मोठया घोटाळयात अडकेल, असे मिशीगन विद्यापीठातील प्रो. न्यान यांनी म्हटले आहे. येत्या जून महिन्यापर्यंत घोटाळा बाहेर येईल, असे त्यांनी सेंटर फॉर पॉलिटिक्स या वेबसाइटच्या वत्तात म्हटले आहे. हा घोटाळा 2012 च्या अध्यक्षीय निवडणुकीआधी उघडकीस येऊ शकतो. घोटाळा जून महिन्यापर्यंत बाहेर येईल याची 100 टक्के शक्यता असल्याचे न्यान यांच्या हवाल्याने डेली मेलच्या वृत्तात म्हटले आहे. न्यान यांनी 1977 ते 2008 पर्यंत झालेल्या घोटाळयांचा अभ्यास करून त्यावर वेिषण केले आहे. विशेष म्हणजे ओबामा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पाहिला तर ते घोटाळयापासून दूर राहणे ही भाग्यकारक बाब असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

    रोनाल्ड रिगन आणि बिल क्लिंटन यांच्या पहिल्या टर्ममधील स्कॅँडलप्रमाणेच ओबामांनाही घोटाळ्यास सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. न्यान यांच्या मते मिडीयाच्या बातम्यांचा रोख कुठे राहील, यावरच अवलंबून आहे.

Trending