आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी’मुळे त्या माउलीला न्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठी (21 डिसेंबर) च्या अंकात ‘कुंकू वाचविण्यासाठी ‘त्या’ माउली ने जिंकली मॅरेथॉन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत 15 डिसेंबर रोजी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे वार्तांकन हृदयद्रावक आहे. पतीचे प्राण वाचविण्यासाठी आणि त्यासाठी लागणार्‍या 15 हजारांच्या वैद्यकीय खर्चासाठी लताबाई करे या 66 वर्षीय माउलीने मॅरेथॉनमध्ये उतरणे हृदय पिळवटणारा प्रसंग आहे. त्या माउलीच्या प्रयत्नाला यशही आले. आता शासन त्या महिलेला मदत करेल. अनेक संस्थाकडून मदतीचा ओघ वाढेल. दोघांना उदंड आयुष्य लाभो, हीच सदिच्छा. ‘दिव्य मराठी’मुळे त्या माउलीला न्याय मिळाला. आपले बातमीदार प्रदीप गुरव यांचे अभिनंदन!