आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्हाव्याने न विचारताच मिशा भादरल्या; युवा दणका संघटनेच्या अध्यक्षाची पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर व्हायरल झालेला ठाकूर यांचा पूर्वीचा व आताचा फोटो - Divya Marathi
सोशल मीडियावर व्हायरल झालेला ठाकूर यांचा पूर्वीचा व आताचा फोटो

नागपूर - न्हाव्याने न विचारता मिशा कापल्या म्हणून ग्राहकाने त्याच्याविरुद्ध  चक्क गुन्हाच दाखल केल्याची घटना समोर आली आहे. नागपूर ग्रामीणमधील कन्हान येथे मंगळवारी ही घटना घडली. मिशीवरून कन्हान शहर युवा दणका संघटनेचे अध्यक्ष किरण किसन ठाकूर यांनी फ्रेंड्स जेंट्स पार्लरचे चालक सुनील लक्षणे यांच्यातील हा वाद झाला. मात्र, सुनीलने आपल्याला धमकी दिल्याने म्हणत ठाकूर यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, ग्रामीण पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. 


काय घडले :  किरण ठाकूर हे फ्रेंड्स जेंट्स पार्लरमध्ये दाढी करायला गेले. तेथे न्हावी सुनील व किरण यांच्या गप्पा रंगल्या. बोलता बाेलता सुनीलने ठाकूर यांच्या मिशीवरून वस्तराच फिरवून टाकला. मिशा उडाल्याचे पाहून ठाकूरही उडालेच! दोघांत वादावादी झाली. लक्षणे यांनी ठाकूर यांना “तुम्हाला जे काही करायचे आहे, ते करा. मी पाहून घेईन,’अशी धमकी दिली. यानंतर ठाकूर यांनी तडक पोलिस स्टेशन गाठले.

 

अखेर गुन्हा दाखल 
हा किरकोळ वाद आहे असे म्हणून पोलिस गुन्हा दाखल करण्यात तयार नव्हते. मात्र सुनील व किरण हमरीतुमरीवर आले. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अखेर किरण ठाकूर यांच्या  तक्रारीवरून पोलिसांनी लक्षणे यांच्याविरुद्ध धमकी दिल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

 

मी सामाजिक कार्यकर्ता, मिशा नसल्याने जनसंपर्क घटला
आपल्या मिशीवर घाला घातल्याने ठाकूर संतापलेले होते. त्यांनी वकील, पोलिस व राजकीय दादा-भाऊंसमोर कैफियत मांडली. पोलिसांना ते म्हणाले, आपण सामाजिक क्षेत्रात काम करतो, यामुळे सर्वपरिचित आहोत. मिशा उडवल्याने आपली ओळखच जणू संपली आहे. अवघडल्यासारखे वाटत असल्याने जनसंपर्कही कमी झाला आहे. माझा मुलाच्या शाळेने पालकांचे ओळखपत्र तयार केले आहे. त्यावर माझा िमशीसह फोटो आहे. आता मुलाला शाळेतून आणायला गेलो तर तेही मला पिटाळून लावतील. यामुळे सुनीलवर गुन्हा दाखल करावा. अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. 

बातम्या आणखी आहेत...