चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे बार्सिलोनाला विजेतेपद

केदार लेले

केदार लेले

May 30,2011 05:38:00 PM IST

बासिर्लोना विरुद्ध मँचेस्टर युनायटेड ही चॅम्पियन्स लीग फुटबॉलची अंतिम लढत मँचेस्टर युनायटेडच्या पाठिराख्यांसाठी 'काळरात्र' ठरली. इनिस्टा, पेड्रो, डेव्हिड व्हिला, मेसी यांनी अप्रतिम खेळ करत बासिर्लोनाला 3-1 असा विजय मिळवून दिला. बासिर्लोनाचे युएफा चॅम्पियन्स लीग मधील हे चौथे जेतेपद आहे.

२००९चे विजेते बासिर्लोनाने दोन्ही सत्रात मँचेस्टर युनायटेडवर वर्चस्व गाजवले! विशेष म्हणजे २००९ साली सुद्धा बासिर्लोनाने मँचेस्टर युनायटेडचा पराभव करीत युरोपियन चॅम्पियन्स लीग करंडक जिंकला होता. या सामन्यात बासिर्लोना तर्फे पेड्रो, डेव्हिड व्हिला व मेसी यांनी गोल मारले, तर मँचेस्टर युनायटेड तर्फे वेन रूनीने एकमेव गोल केला. पेड्रो, डेव्हिड व्हिला व मेसी यांनी गोल केले असले तरी विशेष कौतुक करावे लागेल ते म्हणजे बासिर्लोनाच्या मधल्या फळीचे. अचूक पासिंग व चेंडूवरील अफलातून नियंत्रण याच्या जोरावर बासिर्लोनाने सामन्यावरील पकड शेवटपर्यंत ढिली होऊ दिली नाही. तंत्र, कौशल्य आणि खेळ ह्या तिन्ही आघाड्यांवर बार्सिलोनाने शानदार खेळ केला. 27व्या मिनिटाला इनिस्टाने रचलेल्या उत्कृष्ट चालीचे रूपांतर पेड्रोने गोल मध्ये केले आणि बासिर्लोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. बासिर्लोनाने आघाडी घेतल्यावर केवळ सात मिनिटातच आक्रमक रूनीने पिछाडी भरून काढत मँचेस्टर युनायटेडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात ५४व्या मिनिटाला मेसीने दुसरा गोल केला करून बार्सिलोनाला आघाडीवर नेले आणि डेव्हिड व्हिलाने आणखी एक गोल करत बार्सिलोनाच्या विजेतेपददावर शिक्कामोर्तब केले.

गेल्या तीन वर्षात प्रशिक्षक पेप ग्युआरदिओ याने बासिर्लोनाला युएफा चॅम्पियन्स लीगमध्ये दुसरे विजेतेपद मिळवून दिले आहे. मॅंचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक सर ऍलेक्‍स फर्ग्युसन यांचे तिसऱ्यांदा युएफा चॅम्पियन्स लीग विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न मात्र भंगले. मँचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक ऍलेक्स फर्ग्युसन म्हणाले, 'आमचा संघ बार्सिलोनाचे मध्यरक्षक आणि मेसीला ताब्यात ठेवू शकले नाहीत. या उलट बासिर्लोना संघानेच मँचेस्टर युनायटेडला बांधून ठेवले'. फर्ग्युसन सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले, "बासिर्लोना आपल्या अचूक पासमुळे दुसऱ्या संघाला संमोहित करतात. आम्ही मेसीला काबू करू शकलो नाही. आम्ही बासिर्लोनाच्या मध्यरक्षा पंक्तीला रोखू शकलो नाही. आम्हाला पूर्वार्धात बरोबरी साधली तेव्हा मला वाटले आम्ही दुसऱ्या सत्रात चांगला खेळ करू पण असे होऊ शकले नाही. माझ्या व्यवस्थापनाच्या कारकिर्दीत आम्ही खेळलेल्या संघामध्ये बार्सिलोनाचा हा संघ सगळ्यात सर्वोत्तम संघ आहे".

बार्सिलोनाचे प्रशिक्षक पेप ग्युआरदिओने संघाची तोंड भरून प्रशंसा केली आणि म्हणाले, "बासिर्लोना संघाने आदर्श सांघिक खेळ करीत विजेतेपद पटकावले". पेप ग्युआरदिओ पुढे म्हणाला "मेसीने अर्जेंटिनाच्या दिएगो मॅराडोना आणि रिकी विलाच्या लक्षणीय कामगिरीच्या आठवणी ताज्या केल्या. मेसीने इंग्लिश धरतीवर स्वतःचा पहिला गोल नोंदवताना ५४व्या मिनिटाला आम्हाला २-१ ने आघाडीवर नेले आणि इतक्यावरच न थांबता डेविड व्हिलाला तिसरा गोल करण्यासाठी नामी संधी उपलब्ध करून दिली"

बक्षिसांचा पाऊस

विजेत्या संघाला 5 कोटी 80 लक्ष तर उपविजेत्या संघाला 3 कोटी 61 लक्ष रु. दिले जातात. शिवाय स्पध्रेत प्रत्येक स्तरावर पोहोचल्यानंतर ठरावीक रक्कम दिली जाते. ‘मॅन ऑफ द डे’ आदी पुरस्कारांसह स्पध्रेलाही फोर्ड, मास्टरकार्डसारखे मोठे प्रायोजक लाभतात.X
COMMENT