आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमच्या विधानसभा तिकीट वाटपात सौदेबाजी?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विधानसभा तिकीट वाटपात लाखो रुपयांची साैदेबाजी केल्याचा अाराेप एमआयएमचे कोअर कमिटी सदस्य अंजुम इनामदार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये केला. याबाबत खासदार इम्तियाज यांचे मोबाइल फोन कॉल रेकॉर्डही त्यांनी पत्रकारांसमोर सादर केले. मात्र यात थेट इम्तियाज जलील यांच्याशी संभाषण झाल्याचा एकही कॉल रेकॉर्ड नाही.


कराडमधून पृथ्वीराज चव्हाण यांना पराभव हाेऊ नये म्हणून तिकीट वाटपात गोंधळ करण्यात अाला. या बाबत कराडचे एमआयएमचे उमेदवार अल्ताफ शिकलकर व इनामदार यांच्यादरम्यान फोनवरील 'वीस लाख रुपये मोजल्यावर तिकीट मिळते,' असे संभाषण आहे, तर शिकलकर यांचा तरुण मुलगा शाहरुख व इनामदार यांच्या मोबाइलवरून झालेल्या संभाषणामध्ये तिकिटासाठी ३० लाख रुपये दिल्याचा संवाद असल्याचा इनामदार यांचा अाराेप अाहे. जळगाव जिल्ह्यातील एमआयएम नेत्या जिया बागवान व शाहरुख शिकलकर यांच्यातील संभाषणाचा हवालाही इनामदार यांनी दिला. अंजुम इनामदार हे हडपसरमधून उमेदवारीसाठी प्रयत्न करत हाेते, मात्र एमअायएमने त्यांना तिकिट नाकारले हाेते. अाता इनामदार यांनी पैसे घेऊन पक्षाच तिकिट वाटप झाल्याचा व पक्षातील निष्ठावंतांना डावलले जात असल्याचा अाराेप केला जात अाहे.

सौदेबाजीत पोलिस अधिकाऱ्याचा फाेन नंबर
तिकीट वाटपाच्या आर्थिक व्यवहारामध्ये कराडचा पोलिस अधिकारीदेखील सहभागी असल्याचा आरोप इनामदार यांनी केला. त्यांच्याकडील मोबाइल नंबरवरून फोन आल्याचा त्यांचा दावा अाहे. पोलिस अधिकाऱ्याच्या फोनवरून झालेल्या संभाषणामुळे राजकीय पक्षाच्या तिकीट वाटपात पोलिस अधिकारी सहभागी असल्याची तक्रार पोलिस महासंचालक तसेच निवडणूक आयोगाकडे केल्याचे इनामदार यांनी पत्रकारांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...