आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बार्टीचे समतादूत करणार राज्यातील ७२ गावे आता महिनाभरातच ‘संविधान साक्षर’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भरत हिवराळे औरंगाबाद- खेड्यापाड्यातील सर्व जाती, धर्माच्या लोकांसह महिलांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना कळावी, त्यात दिलेले न्याय, समता, बंधुत्व आणि एकात्मता ही मूलभूत हक्क समजावेत, यासाठी बार्टीच्या “समतादूत’ प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ७२ गावांत २६ नोव्हेंबरपासून “संविधान साक्षर ग्राम’ अभियान राज्यात सुरू झाले आहे. यातून दररोज २५ डिसेंबरपर्यंत विविध याेजनांसह उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. २६ नाेव्हेंबरला संविधान साक्षर ग्रामचे उद्घाटन व उद्देशिका वाचन झाल्यानंतर गावातून प्रभात फेरी काढून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. २७ नोव्हेंबरला गावात समतादूतांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानंतर काव्यात्मक संविधान वाचन करण्यात आले. २८ नोव्हेंबर सांडपाणी व्यवस्था याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येईल, तर २९ ला बार्टी संस्थेची माहिती व विविध उपक्रमांची माहिती दिली जाईल. ३० नाेव्हेंबर राेजी शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाईल. १ डिसेंबरला ग्रामस्थांना भारतीय राज्य घटनेतील उद्देशिकेचा अर्थ समजावून देण्यात येईल. २ डिसेंबरला गावाच्या स्मशानभूमीची स्वच्छता करून तेथे वृक्षाराेपणही करण्यात येणार अाहे. ३ डिसेंबर राेजी नागरिकांना बचत गटांविषयी माहिती दिली जाईल. ४ डिसेंबरला ग्रामस्थांसाठी अाराेग्य शिबिर. ५ डिसेंबर राेजी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती. ६ डिसेंबरला संविधानावर अाधारित पथनाट्य हाेईल. ७ डिसेंबरला विधवा, परितक्त्या, विकलांग महिलांकरिताच्या योजनांची माहिती दिली जाईल. ८ डिसेंबरला ग्रामस्थांचा संवाद हा कार्यक्रम होईल. ९ डिसेंबरला महिला सक्षमीकरण, १० डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा (विषय : माझे गाव), ११ डिसेंबरला संविधानावर आधारित एक दिवसीय चर्चासत्र होईल. १२ डिसेंबरला बाल विवाह प्रतिबंध व बाल मजूर कायदा याविषयी मार्गदर्शन केले जाईल. १३ डिसेंबर राेजी व्यसनमुक्तीवर कार्यक्रम हाेईल. १४ व १५ डिसेंबर राेजी ग्रामस्थांशी संवाद हा कार्यक्रम होईल. १६ डिसेंबर राेजी रक्तदान व डाेळे तपासणी शिबिर. १७ डिसेंबरला विद्यार्थ्यांसाठी “संविधान’वर निबंध स्पर्धा. १८ डिसेंबरला युवक-युवती मेळावा (शैक्षणिक व रोजगार संधी), १९ डिसेंबरला मानवतेची शिकवण यावर प्रबोधन. २० डिसेंबरला अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, २१ डिसेंबरला माहिती अधिकार अधिनियम २००५ विषयी ग्रामस्थांना माहिती देण्यात येईल. २२ डिसेंबर रोजी ग्रामस्थांशी संवाद, तर २३ डिसेंबरला संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्य याविषयी माहिती देण्यात येईल. २४ ला स्वच्छता अभियान राबवण्यात येईल. त्यानंतर २५ डिसेंबरला “संविधान साक्षर ग्राम’ अभियानाचा समारोप व विजेत्यांना बक्षीस वितरण होईल.

संविधान ग्रामसाठी निवड झालेली जिल्हानिहाय गावे
 
वाशीम : पांचाळा, शाहा. बुलडाणा : रसूलपूर कळंबा,लाेखंडा. यवतमाळ: हरसूल, पहापळ. अकाेला: चाचाेंडी (यावलखेडा), बाभुळगाव. अमरावती :  शाेंदाेळा खुर्द, अंजनगाव बारी. भंडारा: लाखाेरी, पालडाेंगरी.  गाेंदिया : काेंकणा, खमारी. नागपूर: पाचगाव, मंगरुळ. वर्धा: परतोडा, गांजी.  अाैरंगाबाद : महालपिंप्री, कच्चीघाटी. बीड : मनूर, चनई. हिंगाेली: नागेशवाडी, मुमडा. नांदेड : टाकळी, बाेनढर-नेरली. उस्मानाबाद: काेल्हेगाव, वडगाव (गां). परभणी : ब्राम्हणगाव, धर्मपुरी. लातूर : हिप्पळगाव, शेखापूर. जालना: इंदेवाडी, खामखेडा. पुणे: कासार अांबाेली, भांडगाव. सांगली: ढालेवाडी, नरसिंहपूर. सातारा: भीमनगर, यरळवाडी.  काेल्हापूर: वडणगे, तिळवणी. साेलापूर: करकंब, वळसंग. चंद्रपूर:  माेहाळी माे, चेकसाेमणपल्ली. गडचिराेली : कसारी,  महागाव. अहमदनगर : सायखिंडी, तांदूळवाडी. धुळे : खर्डे, उडाने. नंदूरबार : नवलपूर, पाताेंडा. जळगाव :पातरखाेडा, खेडी (बु.). नाशिक: माेडाळे, अांबे दिंडाेरी. सिंधुदुर्ग : दारुम, धामापूर. रत्नागिरी : वांद्री, मासू. रायगड : काेन, तळवली. ठाणे : मनाेरमानगर, दिघागाव. पालघर : डेंगाची मेठ, अागाशी. मुंबई उपनगर : रमाबाई आंबेडकर नगर, फुलेनगर. मुंबई : मुकूंदनगर.

संविधानाविषयीचे समज अन्् गैरसमज दूर होतील
राज्यघटना ही कुठल्याही एका जाती, धर्माची नाही, ती प्रत्येक नागरिकांची आहे.  त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थांनी बार्टीच्या “संविधान साक्षर ग्राम’ यात सहभागी व्हावे.संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार जाणून घ्यावेत. जेणेकरून आपल्यामध्ये असलेले समज गैरसमज दूर होतील. - कैलास कणसे, महासंचालक, बार्टी, पुणेअशिक्षित महिलांनाही समजावेत त्यांचे अधिकार
 
डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे कुणा एका जाती,धर्मासाठी लिहिले नाही. ते देशातील सर्व जाती व धर्माच्या लोकांसाठी आहे. शेतात काम करणाऱ्या महिलांसह प्रत्येकाला भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार कळावेत. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, यासाठी हे संविधान साक्षर ग्राम अभियान राबवण्यात येत आहे. 
- प्रज्ञा वाघमारे, मुख्य प्रकल्प संचालिका, समतादूत, बार्टी, पुणे.