आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळात ताशी 28,163 किमी वेगाने भ्रमण करणाऱ्या स्पेस स्टेशनमध्ये रंगला बेसबाॅल सामना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन : अंतराळवीरांनी जगापासून दूर जात आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये वर्ल्ड सिरीजच्या निमित्ताने मैत्रीपूर्ण बेसबाॅल सामना खेळला गेला. अंतराळवीर जेसिका मीरने ट्विट करून त्याचे फुटेज शेअर केले. हा खेळ जगापासून वेगळा आहे. १७,५०० मैल (२८,१६३ कि.मी.) प्रती तास वेगाने भ्रमण करणाऱ्या स्पेस स्टेशनमधील सामन्याने आनंद दिला, अशी आशा आहे. पृथ्वीवर आल्यावर वर्ल्ड सिरीज बघू, असे त्यांनी लिहिले.


व्हिडिओमध्ये जेसिका मीर, क्रिस्टिना कोच आणि अँड्रयू मॉर्गन सामना खेळताना दिसत आहेत. यामध्ये क्रिस्टिना कोचच्या दिशेने बाॅल फेकताना दिसत आहे. फ्लॅॅशलाइटचा उपयाेग बॅट म्हणून करून शाॅट मारताना माॅर्गन दिसत आहेत. बॉल बॅटला लागून मीरच्या हातात जाताे आणि माॅर्गन आऊट हाेतात.