आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Basketball Player Kobe Bryant Dead In Helicopter Crash With Daughter And Others News And Updates

प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू कोबी ब्रायनचा 13 वर्षीय मुलीसह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅलिफोर्नियातील कॅलाबासमध्ये हेलिकॉप्टर अपघातात ब्रायन आणि त्यांच्या मुलीसह 9 जणांचा मृत्यू
  • 2018 मध्ये ब्रायनला डियर बास्केटबॉल या लघु अ‍ॅनिमेटेड चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता

वॉशिंग्टन - अमेरिकन बास्केटबॉलपटू कोबी ब्रायन आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीचा कॅलेफॉर्नियात एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ब्रायन रविवारी आपल्या खासगी हेलिकॉप्टरने जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मुलगी गियाना आणि इतर सात जण सोबत होते. पोलिसांच्या मते,  कैलाबसासमध्ये ब्रायन यांचे हेलिकॉप्टर संतुलन बिघडल्याने खाली कोसळून स्फोट झाला. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला. 

कोण आहे कोबी ब्रायन ?


कोबी ब्रायनने आपल्या कारकिर्दीची 20 वर्षे लॉस एंजेलिस लेकर्स संघासोबत घालवले. या दरम्यान त्याने आपल्या संघाला 5 वेळेस विजेता बनवले होते. तो स्वत: 2008 मध्ये एनबीएचा सर्वाधिक मूल्यवान प्लेअर (एमव्हीपी) राहिला होता. याशिवाय दोनदा अंतिम फेरीत एमव्हीपीसाठी निवड झाली होती. ब्रायनने ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या संघाला दोन वेळा चॅम्पियन बनवले. ब्रायनने एप्रिल 2016 मध्ये व्यावसायिक कारकीर्दीतून निवृत्ती घेतली. 

2018 मध्ये ब्रायनला त्याच्या 'डियर बास्केटबॉल' या लघु अ‍ॅनिमेटेड चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट त्याने 2015 मध्ये बास्केटबॉलप्रती आपले प्रेम दर्शवण्यासाठी लिहिला होता. ब्रायन आपल्या मुलीच्या टीमला कोचिंग देण्यासाठी निघाला होता


कोबी ब्रायन रविवारी खासगी हेलिकॉप्टरने कॅलिफोर्नियाच्या थाउसेंड ओक्स येथील माम्बा स्पोर्ट्स अकादमीत जात होते. तेथे तो आपली मुलगी आणि तिच्या संघाला कोचिंग देत होता. पोलिसांनी सांगितल्यानुसार माम्बामध्ये मुले आणि मुलींचा बास्केटबॉल स्पर्धा होणार होती. आता या सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्रायन यांच्या मृत्यूची बातमी समजताच शेकडो लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांची जर्सी घालून अकादमीच्या बाहेर जमले.

अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष आणि गायिका टेलर स्विफ्ट यांनी व्यक्त केला शोक


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ब्रायन यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना म्हटले की, "ते कोर्टवर एक दिग्गज होते. ते आपला दुसरा डाव सुरू करणार होते, जे की महत्वपूर्ण ठरला असता. पालक म्हणून गियानाला गमावणे दुःखद बाब आहे. मिशेल आणि माझ्याकडून ब्रायन कुटुंबियांसाठी प्रार्थना आणि संवेदना."तर दुसरीकडे गायिका टेलर स्विफ्टने लिहिले की, "ही अत्यंत दुःखद घटना आहे. ब्रायनच्या कुटुंबावर केवढे आभार कोसळले याबाबत मी कल्पना करू शकत नाही. व्हनेसा आणि अपघातात प्राण गमवलेल्यांच्या कुटुंबासाठी माझ्या संवेदना आणि प्रेम."