आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयातुन बाहेर येताच जावयाने सासु,सासरा आणि मेव्हण्यावर केला तलवारीने वार, जो कोणी समोर येत होता त्याच्यावरही करू लागला वार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बठिंडा(पंजाब)- जावयाने भावासोबत मिळून न्यायालयाच्या बाहेरच केला हल्ला. आरोपीने पहिले सासुच्या डोक्यात तलवार मारली, तिला वाचवण्यासाठी आलेला सासरे, मेव्हणा आणि त्याच्या मित्रांवरही तलवारीने वार केले. हल्ला एसएसपी कार्यालयाच्या बाहेर न्यायालय चौकात झाला.

 

रोज नवीन नंबरने फोन करून धमकी द्यायचा

सरकारी रुग्णालयात भर्ती करण्यात आलेले बठिंडाच्या कोटसमीर सिंगमध्ये राहणाऱ्या गुरदीप सिंगने सांगितले की, त्यांची मुलगी रूपिंदर कौरचे लग्न अरूणसोबत झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. जानेवारीत तिचा भाऊ साहिल बहिण रुपिंदरला लोहड़ी देण्यासाठी गेला होता. त्यावेळी अरुण रुपिंदरला मारत होता. त्यांच्या मुलांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनादेखील मारले. त्यामुळे रूपिंदर माहेरीच राहत होती. तेव्हापासून अरूण रोज नवीन नंबरवरून तिला फोन करून त्रास देत होता. त्यांनतर त्यांनी न्यायालयात घटस्फोटारा अर्द दाखल केला. एक वर्ष उलटले तरी यांच्या प्रकरणाचा निकाल लागत नव्हता.   त्यामुळे त्यांनी गावातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीची मदत घेण्याचा निर्णय घेतला, आणि पैसे वापस मिळण्याचा अर्ज दाखल केला.


वकीलांना भेटून सगळा परिवार सकाळी 10 ला महिला न्यायालयात जात होता. न्यायालय चौकात जाताच अरूण आणि त्याचा भाऊ सुखदेवने त्यांच्यावर हल्ला चढवला. अरुणच्या हातात तलवार होती आणि सुखदेवच्या हातात बॅट होती. अरूणने आधी तलवार सासु मनप्रीत कौर यांच्या डोक्यात मारली नंतर त्यांना वाचवण्यासाठी आलेले गुरदीप यांच्या डोक्यातही तलवारीचे वार केले. यादरम्यान साहील आणि त्याच्या मित्रांनी त्या दोघांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतर सुखदेवने रूपिंदर कौर यांच्यावर बॅटने अनेक वार केले. 


या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी अरूण आणि सुखदेव यांना अटक केली आहे.
- सुखवीर कौर, एसआय.

बातम्या आणखी आहेत...