आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त वेळ झोपणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जातात अतिरिक्त गुण; अमेरिकेतील बेलोर विद्यापीठाचे अनोखे उपक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - परीक्षा व मार्कांच्या स्पर्धेत मुलांच्या झोपेची वेळ कमी होत आहे आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील बेलोर युनिव्हर्सिटीने मुलांना आठ तास झोपेचे अनोखे 'चॅलेंज' दिले आहे. म्हणजे जी मुले परीक्षेच्या काळात सलग पाच दिवस आठ तास झोपतील, त्यांना परीक्षेत अतिरिक्त गुण दिले जातील. बेलोर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्कुलिन यांनी सांगितले, 'रात्र-रात्र जागून केला तरच चांगला अभ्यास होतो असा मुलांमध्ये समज असतो. आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा केली तर त्यांनी सांगितले की परीक्षेच्या काळात एक तर झोप चांगली घेऊ शकतो किंवा मार्क तरी. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तर आश्चर्यकारक मत मांडले. कमी झोप झाल्यास विस्मरणाचा धोका असतो.


फक्त 10 टक्के विद्यार्थीच घेतात आठ तासांची झोप 
> 'स्लीप चॅलेंज'मध्ये जादा गुणांचा नियम आणण्यापूर्वी विद्यापीठाने मुलांच्या झोपेबाबत अभ्यास केला. 
> निकर्ष्क आला- पदवी किंवा त्याआधीच्या वर्गातील सरासरी 10 टक्के मुले 8 तास झोप घेतात. 
> पुरेशी झोप न होण्यामागे 75 टक्केहून जास्त कारण अभ्यास व गॅजेटवर आहे.
> फक्त कॉलेजच्या मुलांचा विचार केला तर, पुरेशी झोप न घेणाऱ्यांची संख्या आता 70 टक्क्यांपेक्षाही अधिक झाली आहे.
> युनिव्हर्सिटीचा दावा आहे, 'स्लीप चॅलेंज' सुरू झाल्यापासून 8 तास झोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 80 ते 90% पर्यंत वाढली. 
> कर्मचाऱ्यांनी पुरेशी झोप न घेतल्यास देशाच्या जीडीपीत 2% पर्यंत घट होऊ शकते.


अशी मोजणार विद्यार्थ्यांची झोप
- पाठ असलेल्या गोष्टीही पुन्हा लक्षात येत नाहीत. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात आठ तास झोप घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. यातील चांगली गोष्ट म्हणजे '8 तास चॅलेंज' मध्ये टॉपर होण्यासाठी विद्यार्थ्याला तासनतास अभ्यासाला बसण्याची गरज भासत नाही.' 
- आठ तास झोप घेणाऱ्यांना कॉलेज प्रशासन अतिरिक्त मार्क देते, त्याला 'मिनी इन्सेन्टिव्ह' म्हणतात. जी मुले हे चॅलेंज घेतात त्यांना कॉलेजच्या वतीने मनगटावर बांधावयाचे 'स्लीप मॉनिटरिंग डिव्हाइस' दिले जाते. हे डिव्हाइस मुलांच्या झोपेच्या वेळेचा डेटा कॉलेज प्रशासनाला पुरवते आणि त्या आधारावर या मुलांच्या झोपेच्या वेळा नोंदवल्या जातात. पुरेशी झोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारे गुण शेवटच्या निकालात जोडले जातात. 
- युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना तर 'स्लीप थेरपी'ही शिकवली जाते. यात मुलांना गाढ झोपेचे फायदे, तणाव कमी करण्याचे फंडे शिकवले जातात. सध्या अभ्यास, तणाव व गॅजेटमुळे मुलांची झोप पूर्ण होत नसल्याची समस्या भेडसावत आहे. झोपेची तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर उपाय योजले जात आहेत. वर्षभरापूर्वी अमेरिकेतील विमा कंपनी अँटेनाने घोषणा केली होती, जे कर्मचारी 7 ते 8 तास झोप घेतील त्यांना एका दिवसाला 15 हजार रुपयांपर्यंत जादा वेतन दिले जाईल.'

बातम्या आणखी आहेत...