Home | Sports | From The Field | BCCI Central Contract list released Dhawan, Bhuvneshwar out of Grade A plus, Pant New entrant

मुरली विजय, रैनाची घसरण; ऋषभ, कुलदीपची प्रगती, खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर

वृत्तसंस्था | Update - Mar 09, 2019, 11:03 AM IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2018-19 साठी खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर केली. यामधून मुरली विजय आणि सुरेश रैनासह सहा ख

 • BCCI Central Contract list released Dhawan, Bhuvneshwar out of Grade A plus, Pant New entrant

  मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2018-19 साठी खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर केली. यामधून मुरली विजय आणि सुरेश रैनासह सहा खेळाडू बाहेर पडले आहेत. दुसरीकडे युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसह चार नव्या चेहऱ्यांचा या यादीत समावेश करण्यात आला. यंदा २५ खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले. तसेच महिलांच्या गटात २० खेळाडूंना ही संधी मिळाली आहे.


  ग्रेड अ + मधून शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार हे दाेघेही बाहेर झाले आहेत. त्यांना आता ब गटात स्थान मिळाले. तसेच शमी, कुलदीप आणि ईशांत यांनी प्रगती साधताना अ गटात धडक मारली. हे तिघेही यापूूर्वी ब गटात हाेते. तिन्ही फाॅरमॅटमध्ये अपयशी ठरलेल्या भुवनेश्वर कुमारची घसरण झाली


  - पुरुष गट : ग्रेड अ + (७ काेटी) : विराट काेहली, राेहित शर्मा, जसप्रीत बुमराह.
  - ग्रेड अ : (५काेटी) : अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, पुजारा, अजिंक्य रहाणे, धाेनी, धवन, शमी, ईशांत, कुलदीप, ऋषभ पंत
  - ग्रेड ब : (३ काेटी): लाेकेश राहुल, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पांड्या.
  - ग्रेड क : (१ काेटी) : केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू,मनीष पांडे, हनुमा विहारी, खलील अहमद, वृद्धिमान साहा.
  - झुलन गाेस्वामी अ मधून ब ग्रेडमध्ये : वेगवान गाेलंदाज गाेस्वामीची घसरण झाली. ती आता अ मधून ब ग्रेडमध्ये आली. पूनम राऊतने प्रगती साधली. तिने अ गटात धडक मारली. जेमिमाने ब मध्ये स्थान मिळवले. वेदा व राजेश्वरीची क गटात घसरण झाली.
  - ग्रेड अ : (५० लाख) : मिताली राज, हरमनप्रीत काैर, स्मृती, पूनम यादव
  - ग्रेड ब : (३० लाख) : एकता बिस्ट, झुलन गाेस्वामी, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमिमा.

Trending