आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BCCI Chief Selector: Sunil Joshi To Be Chairman Of The Senior Men’s Selection Committee

15 कसोटी सामने खेळणारे सुनील जोशी यांची चीफ सिलेक्टरपदी निवड, हरविंदर सिंगही समितीत सामील; 1 वर्षांचा असेल कार्यकाळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुनील जोशीने भारतासाठी 15 कसोटी आणि 69 वनडे, तर हरविंदर सिंगने 3 कसोटी आणि 16 वनडे सामने खेळले आहेत

स्पोर्ट डेस्क- डावखुरे स्पिनर सुनील जोशी यांची भारतीय क्रिकेट संघाच्या चीफ सिलेक्टरम्हणून निवड झाली आहे. बीसीसीआयच्या नवीन सल्लागार समितीने आज(बुधवार) त्यांच्या नावाची घोषणा केली. जोशी यांच्याशिवाय हरविंदर सिंग यांनाही सीनियर सिलेक्शन कमेटीमध्ये सामील करण्यात आले आहे. या दोघांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असेल.


यावर्षीच जानेवारीमध्ये चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद आणि गगन खोड़ा यांचा कार्यकाळ संपला होता. या दोन पदांसाठी मदनलाल, सुलक्षणा नाइक आणि आरपी सिंगच्या सीएसीने पाच उम्मेद्वारांना शॉर्टलिस्ट केले होते. त्यांचा आज इंटरव्ह्यू घेण्यात आला. यात लक्ष्मन शिवरामाकृष्णन, राजेश चौहान आणि वेंकटेश प्रसाददेखील सामील आहेत.


डावखुरे स्पिनर सुनील जोशीने भारतासाठी 15 टेस्ट आणि 69 वनडे सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात त्यांच्या नावे 41 आणि वनडेमध्ये 69 विकेट्स आहेत. जोशी हैदराबाद आणि जम्मू-काश्मीर क्रिकेट टीमचे प्रशिक्षक होते. 2015 मध्ये ते ओमानचे कोच नियुक्त झाले होते. जोशी बांग्लादेश आणि किंग्स इलेवन पंजाब टीमचे स्पिन बॉलिंग कोचदेखील होते.

बातम्या आणखी आहेत...