आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BCCI President Sourav Ganguly On Coronavirus: IPl Will Start On Time, Not To Worry About Virus Threat

'आयपीएलवर कोरोना व्हायरसचा काहीच परिणाम होणार नाही, ठरलेल्या वेळेत सुरू होईल टूर्नामेंट'- सौरव गांगुली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात दक्षिण आफ्रीकेसोबत 3 वनडे सामन्यांची सीरीज होईल, पहिला मॅच 12 मार्चला धर्मशालामध्ये
  • आयपीएलचा पहिला सामना 29 मार्चला मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपरकिंग्सदरम्यान खेळला जाणार आहे

स्पोर्ट डेस्क- चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस आता जगभरातील अनेक देशात पसरला आहे. यामुळे जवळपास 60 स्पोर्ट्स टूर्नामेंटवर याचा परिणाम पडला आहे. यातच कोरोना भारतात दाखल झाल्यामुळे 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)वरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने मंगळवारी म्हटले की, कोरोना व्हायरस चा आयपीएलवर काहीच परिणाम होणार नाही. दक्षिण आफ्रिकेसोबत 3 वन-डे सामन्यांच्या सीरीजनंतर आयपीएल ठरलेल्या वेळेत सुरू होईल.


आयपीएलचे गवर्निंग काउंसिल चेयरमन ब्रजेश पटेलनेही गांगुलीच्या मताशी सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले की, ‘‘कोरोना व्हायरसबाबत कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सर्व सामने वेळेवर खेळवले जातील.’’ 


दक्षिण आफ्रीका संघ भारत दौऱ्यावर येत आहे. दोन्ही संघांमध्ये 12 मार्चला धर्मशालामध्ये पहिला सामना होत आहे, दुसरा 15 ला लखनऊमध्ये आणि तिसरा सामना 18 मार्चला कोलकातामध्ये होत आहे. यानंतर 29 मार्चला आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपरकिंग्सदरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.

खेळाडून हँड शेकर करणार नाहीत

कोरोना व्हायरसमुळे 17 खेळांचे जवळपास 60 पेक्षा जास्त टुर्नामेंट्सवर प्रभाव पडला आहे. इंग्लँड क्रिकेट टीमचा कर्णदार जो रूट म्हणाला ही, त्यांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर खेळाडूंशी हँड शेकर करणार नाही. अमेरिकी बास्केटबॉल लीग एनबीएनेही आपल्या खेळाडूंना हँड शेक न करण्यास सांगितले आहे. स्विट्जरलँडने स्विस सुपर लीग रद्द केली. पण, इंटरनॅशनल ऑलिंपिक कमेटी (आयओसी)ने स्पष्ट केले आहे की, टोक्यो ऑलिंपिक ठरलेल्या वेळेत होईल.