• BCCI president Sourav Ganguly On Mahendra Singh Dhoni future, Says Enough time to decide on MS Dhoni future

क्रिकेट / धोनीच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी बराच वेळ आहे, काही महिन्यात सर्वकाही स्पष्ट होईल- सौरव गांगुली

  • धोनीने आपला शेवटचा सामना वर्ल्ड कप 2019 मध्ये न्यूजीलँडविरुद्ध खेळला होता

दिव्य मराठी वेब टीम

Nov 30,2019 12:24:00 PM IST

स्पोर्ट डेस्क- काल भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीवर एक मोठं वक्तव्य केले. ते म्हणाले की, आयपीएल 2020 नंतर धोनीच्या भविष्याबद्दल सर्वकाही स्पष्ट होईल. त्यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, "धोनीच्या भविष्याचा विचार करण्यासाठी आपल्याकडे खूप वेळ आह. आमची थिंकटँक टीम धोनीच्या भविष्यबाबत स्पष्ट आहे.


धोनीने आपला शेवटचा सामना विश्वचषक 2019 मध्ये न्यूजीलँडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळला होता. भारत तो सामना 18 रनाने हारला. 27 नोव्हेंबरमध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात धोनीला त्याच्या पुनरागमनावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, मला जानेवारी 2020 पर्यंत काहीच विचारू नका, असे धोनीने उत्तर दिले होते.

X
COMMENT