Home | Sports | Cricket | Cricket Classic | BCCI will search new coach

विश्वचषकानंतर भारतीय टीमला मिळू शकतो नवीन प्रशिक्षण स्टाफ; शास्त्री व सहकाऱ्यांचा कार्यकाळ संपणार

वृत्तसंस्था | Update - Mar 21, 2019, 11:21 AM IST

विश्वचषक संपताच प्रशिक्षक पदासाठी काढणार जाहिरात, भारत-वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी घेतील सर्व उमेदवारांच्या मुलाखती

  • BCCI will search new coach

    मुंबई । इंग्लंडमध्ये ३० मे ते १४ जुलैपर्यंत होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय टीमला नवीन प्रशिक्षण स्टाफ मिळू शकतो. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यकाळ विश्वचषकानंतर समाप्त होत आहे. बीसीसीआयजवळ त्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय नाही. मात्र, विश्वचषकानंतर मंडळ नव्या प्रशिक्षकाला प्राधान्य देईल. त्यासाठी मंडळाने जाहिरात देण्याचे ठरवले आहे. मंडळ विश्वचषक संपताच प्रशिक्षक पदासाठी जाहिरात काढेल आणि त्वरित भारत-वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतील. नाव अंतिम होईपर्यंत सध्याच्या स्टाफला एका मालिकेसाठी कायम ठेवता येऊ शकते. मात्र, ही सर्व प्रक्रिया विश्वचषकाच्या प्रदर्शनावर आधारित आहे.


    रवी शास्त्रीची अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर जुलै २०१७ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा समावेश आहे. नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी यंदा मंडळ सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची समिती बनवू शकते.

Trending