• Home
  • Sports
  • Cricket
  • BCCI's meeting is today : Ganguly's tenure will be extended if the Lodha Committee's recommendations end

बीसीसीआयची सभा आज / लोढा समितीच्या शिफारशी संपल्यास गांगुलीचा कार्यकाळ वाढणार

सीएसी नियुक्ती आणि आयसीसीमध्ये मंडळाच्या प्रतिनिधीच्या नावावर होणार महत्त्वाची चर्चा

Dec 01,2019 09:22:27 AM IST

मुंबई : बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी होणार आहे. तीन वर्षांनी मंडळाची बैठक होईल. सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक होणार आहे. यात लोढा समितीच्या शिफारशींना शिथिलता देणे किंवा समाप्त करण्याचा महत्त्वाचा मुद्दा राहील. त्यासह क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) नियुक्तीवर आणि आयीसीसीमध्ये बीसीसीआयच्या प्रतिनिधी नियुक्तीवरदेखील चर्चा होईल. जर लोढा समितीच्या शिफारशी समाप्त झाल्यास गांगुलीचा कार्यकाळ वाढू शकतो. सध्या त्याचा कार्यकाळ १० महिन्यांचा आहे. गांगुली गेल्या महिन्यात बीसीसीअायचे अध्यक्ष म्हणून निवडल्या गेला. त्यापूर्वी, ३३ महिने सर्वोच्च न्यायालयाची समिती (सीओए) बीसीसीआयचे कामकाज पाहत होती. बैठकीत गेल्या तीन वर्षांच्या आर्थिक बाबींना मंजुरी मिळेल. त्यासह निवड समितीसह इतर समितींवरील नियुक्ती होतील.


समाप्त होऊ शकतो अधिकाऱ्यांचा विश्रांती कालावधी : बैठकीत लोढा समितीमधील सुधारणेवर चर्चा होईल. त्यासह विश्रांती कालावधीदेखील चर्चाचा मुद्दा राहील. सर्वोच्च न्यायालयाकडून स्वीकारलेल्या संविधानानुसार जर कोणत्या पदाधिकाऱ्याने तीन वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केल्यास, त्याला तीन वर्षांसाठी अनिवार्य विश्रांती घ्यावी लागेल. सध्याचे पदाधिकाऱ्यांना वाटते की, मंडळ व राज्य संघटनेत २ कार्यकाळ वेगवेगळे पूर्ण केलेले असावे. जर हा प्रस्ताव एक तृतीयांश बहुमताने पारित झाल्यास गांगुली व सचिव जय शाहचा कार्यकाळ वाढू शकतो. भविष्यात सर्वसाधारण बैठकीत एक तृतीयांश बहुमतासह संविधानात कोणत्याही संशोधनास मान्यतेचा पर्याय मिळेल.


आयसीसीमध्ये दबदबा वाढवण्यासाठी ७० वर्षे वयाची अट रद्द होणार


गेल्या ३ वर्षांत आयसीसीमध्ये बीसीसीआयचे वजन कमी झाले आहे. सर्वसाधारण बैठकीत ७० वर्षे वयाचे बंधनदेखील रद्द होऊ शकते. त्यामुळे आयीसीमध्ये बीसीसीआयचा कोणता अनुभवी व्यक्ती प्रतिनिधित्व करेल. अशा स्थितीत माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या बीसीसीआयकडून आयसीसी बैठकीत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा होईल. संविधानानुसार, ९ सदस्यीय अपेक्स काैन्सिलचे प्रमुख सीईओ असतात. मात्र, सध्याच्या पदाधिकाऱ्यांना वाटते की, सचिवांनी ही भूमिका बजवावी आणि सीईओ सचिवांनी अंतर्गत कामे करावीत.

X