आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: रॉयल फॅमिलिशी संबंधीत आहे ही घटस्फोटीत अभिनेत्री, रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारून मिळवली कौतूकाची थाप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस अदिती राव हैदरीचा आज 32वा वाढदिवस आहे. तिचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 ला हैदराबादमध्ये झाला होता. रॉयल फॅमिलिमध्ये जन्मलेली आदिती घटस्फोटित आहे. तिचे लग्न टीव्ही स्टार सत्यदीप मिश्रासोबत झाले होते. लवकरच त्यांच्यात काडीमोड झाला. अदिती ही इंडस्ट्रीतील अशी अॅक्ट्रेस आहे, जिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अदितीने बहुतेक चित्रपटांमध्ये सपोर्टिंग रोल केले होते. तिने ब्लॉकबस्टर चित्रपट 'पद्मावत' चित्रपटात रणवीर सिंह म्हणजेच अल्लाउद्दीन खिल्जीची पत्नी 'मेहरुनिसा'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिचा अभिनय आणि सौंदर्याचे सर्वांनीच कौतूक केले.

 

अदिती राव हैदरीचा संबंध दोन रॉयल फॅमिलींसोबत आहे. त्यातील एक आहे, मोहम्मद सोहेल अकबर हैदरी आणि दुसरी फॅमिली आहे जे. रामेश्वर राव. अदिती अकबर हैदरींची नात आहे. अकबर हैदरी हे हैदराबादचे माजी पंतप्रधान होते. तर दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडील जे.राजेश्वर राव हे तेलंगणाच्या वनापर्थीचे राज्यकर्ते होते. आमिर खानची पत्नी किरण राव देखील याच घराण्यातील आहे, किरण आणि अदिती या नात्याने बहिणी आहेत. अदितीच्या पित्याचे नाव एहसान हैदरी आणि आईचे नाव विद्या राव आहे. ती जेव्हा दोन वर्षांची होती, तेव्हाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून ती आईजवळ राहात होती. अदितीचे शिक्षण दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये झाले होते.


पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या अदिती रावबद्दल बरेचकाही...

 

 

बातम्या आणखी आहेत...