Home | Gossip | B'Day: South Actress Bhanupriya Interesting Facts

B'day : एकेकाळी अशी दिसायची 90's ची ही अभिनेत्री, या कारणाने घेतला शाळा सोडण्याचा निर्णय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 15, 2019, 12:00 AM IST

सिनेमांत ओळख मिळवण्यासाठी ठेवले भानुप्रिया नाव... 

 • B'Day: South Actress Bhanupriya Interesting Facts

  मुंबईः भानुप्रिया साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील असे एक नाव आहे, ज्याला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. भानुप्रियाने तामिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे. याशिवाय 90 च्या दशकात बॉलिवूड सिनेमांमध्ये ही अभिनेत्री झळकली आहे. भानुप्रियाचा जन्म 15 जानेवारी, 1967 रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंदरी (रंगमपेटा गाव) येथे झाला. वयाच्या 17 व्या वर्षी भानुप्रियाने अभिनय करिअरला सुरुवात केली. तिचा पहिला सिनेमा 1983 मध्ये रिलीज झालेला 'मेल्ला पेसुन्गल' आहे. हा एक तामिळ सिनेमा होता. 90च्या दशकात बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेल्या भानुप्रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये दीडशेहून अधिक सिनेमे केले आहेत.

  थट्टा होण्याच्या भीतीने भानुप्रियाने सोडली होती शाळा...
  भानुप्रियाचे खरे नाव मंगा भामा आहे. तिच्या घरी अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. शाळेत असताना भाग्यराजा गुरू एकेदिवशी शाळेत आले. त्यांना त्यांचा सिनेमात एका टीन एज मुलीला घ्यायचे होते. त्यांनी भानुप्रियाची निवड केली. मात्र फोटोशूटवेळी भानुप्रिया खूप छोटी दिसली. त्यामुळे त्यांनी तिला सिनेमातून काढून टाकले. जेव्हा भानुप्रियाला हे समजले, तेव्हा ती पुन्हा शाळेत कधीच गेली नाही. कारण शाळेतील विद्यार्थी आपली थट्टा उडवतील असे तिला वाटले होते.


  पुढील स्लाईड्समध्ये वाचा, 90 च्या दशकातील अॅक्ट्रेस भानुप्रियाच्या आयुष्यातील FACTS...

 • B'Day: South Actress Bhanupriya Interesting Facts

  सिनेमांत ओळख मिळवण्यासाठी ठेवले भानुप्रिया नाव... 
   
  साऊथ फिल्म इंडस्ट्री असो वा बॉलिवूड, सगळीकडे तिला भानुप्रिया या नावाने ओळखले जाते. मात्र तिचे खरे नाव मंगा भामा आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते, की सिनेसृष्टीत ओळख मिळवण्यासाठी नाव बदलून भानुप्रिया असे ठेवले.   
    


   

 • B'Day: South Actress Bhanupriya Interesting Facts

  चेन्नईत गेले भानुप्रियाचे बालपण... 
   
  राजमुंदरीमध्ये भानुप्रियाचा जन्म झाला, मात्र तिचे बालपण मद्रास (आता चेन्नई) येथे गेले. ती दोन वर्षांची असताना तिची आई तिला घेऊन मद्रास येथे आल्या. त्यामुळे भानुप्रियाला अनेक लोक मद्रासी बाला या नावानेही ओळखतात.  


   

 • B'Day: South Actress Bhanupriya Interesting Facts

  फोटोशूटनंतर सिनेमात मिळाली संधी...
   
  शाळेत असताना तिला सिनेमा मिळाला नव्हता. मात्र त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. सिनेमात संधी शोधत राहिली. तिने फोटोशूटदरम्यान भारतीराजा गुरु यांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिला 'Pasiyadu' या तामिळ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.  या सिनेमाचे शूटिंग सुरु असताना तिला  वामसी गुरु यांच्या 'सितारा' सिनेमाची ऑफर मिळाली आणि त्यानंतर 'चंद्रंगम' हा सिनेमा तिला मिळाला. यापैकी  'सितारा' हा सिनेमा पहिले रिलीज झाला. हा सिनेमा हिट ठरला आणि  राष्ट्रीय स्तरावर सिनेमा  बेस्ट रीजनल फिल्मसह अनेक पुरस्कार मिळाले.  


   

 • B'Day: South Actress Bhanupriya Interesting Facts

  आदर्श कौशलसोबत लग्न... 
   
  भानुप्रियाने एका मुलाखतीत सांगितले होते, की आदर्श कौशल आणि तिचा प्रेमविवाह होता.  आदर्श USA ला स्थायिक असल्याने फोनवरच दोघांचे बोलणे व्हायचे. भानुप्रियाचे कुटुंबीय सुरुवातीला त्यांच्या लग्नाच्या विरोधात होता. मात्र नंतर हा विरोध मावळला. भानुप्रियाने 14 जून, 1998 रोज कॅलिफोर्नियात आदर्श कौशलसोबत लग्न केले.  2003 मध्ये त्यांची मुलगी अभिनयाचा जन्म झाला. 2005 मध्ये मात्र भानुप्रिया आणि आदर्श यांचा घटस्फोट झाला आणि ती भारतात परतली. आता ती मुलीसोबत चेन्नईत स्थायिक झाली आहे. 


   

 • B'Day: South Actress Bhanupriya Interesting Facts

  भानुप्रियासाठी दुसरे कलाकार करायचे आवाज डब... 
   
  सुरुवातीच्या काळात भानुप्रियासाठी दुसरे कलाकार आवाज डब करत असे. सुरुवातीच्या दोन सिनेमांसाठी लक्ष्मी गुरु आणि सरिता गुरु यांनी आवाज डब केला होता. मात्र त्यानंतर 'अन्वेषणा' या सिनेमापासून भानुप्रियाने स्वतः आवाज द्यायला सुरुवात केली.  


   

 • B'Day: South Actress Bhanupriya Interesting Facts

  बॉलिवूडमध्ये काम...
   
  भानुप्रियाने 1986 मध्ये 'दोस्ती दुश्मनी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. तिने तिच्या करिअरमध्ये सुमारे 150 सिनेमांत काम केले.  यामध्ये 'दोस्ती-दुश्मनी' (1986), 'इंसाफ की पुकार' (1987), 'खुदगर्ज' (1987), 'मर मिटेंगे'(1988), 'तमंचा' (1988), 'सूर्या' (एन अवेकनिंग) (1989), 'दाव पेंच' (1989), 'गरीबों का दाता' (1989), 'कसम वर्दी की' (1989), 'जहरीले' (1990), 'भाभी' (1991) या बॉलिवूड सिनेमांचा समावेश आहे. दोस्ती दुश्मनी हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. 


   

 • B'Day: South Actress Bhanupriya Interesting Facts

  (फोटो- भानुप्रियाची बहीण शांतिप्रिया)


  भानुप्रियाची बहीण आहे अॅक्ट्रेस... 
   भानुप्रियाला एक बहीण असून तिचे नाव 'शांतिप्रिया' आहे. भानुप्रियाप्रमाणेच शांतीसुद्धा तमिल, तेलगुसोबत बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकली आहे. बॉलिवूडमध्ये  'सौगंध'सह 90 च्या दशकातील ब-याच सिनेमांत शांतिप्रियाने काम केले, मात्र भानुप्रियासारखी प्रसिद्धी तिला मिळू शकली नाही.  

   

Trending