आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : इस्लाम धर्म स्विकारुन शर्मिला टागोर झाल्या होत्या आयशा सुल्तान, सासुने लग्नापुर्वीच घातली होती ही अट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळः बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि करीना कपूरच्या सासूबाई शर्मिला टागोर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी वयाची 74 वर्षे पूर्ण केली आहे. शर्मिला यांनी आपल्या लग्नाच्या आधी इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. धर्मांतर केल्यानंतर शर्मिला यांचे नाव आयशा सुल्तान असे ठेवण्यात आले. त्यानंतर त्या पतौडी घराण्याचे नवाब मन्सूर अली खां पतौडी यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःहून नव्हे तर एका व्यक्तीच्या हट्टामुळे लग्नापूर्वी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. हा हट्ट होता शर्मिला टागोर यांच्या सासूबाई आणि भोपाळचे शेवटचे नवाब हमीदुल्ला खां यांच्या कन्या साजिदा सुल्तान यांचा. साजिदा सुल्तान यांच्या हट्टापायी शर्मिला यांना इस्लाम धर्माचा स्वीकार करावा लागला होता.

 

साजिदा सुल्तान यांनी लग्नासाठी शर्मिला यांच्याकडे ठेवली होती एक अट
इतिहासकार सैय्यद अख्तर हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मन्सूर अली खाँ पतौडी यांनी आपल्या आई साजिदा सुल्तान यांच्याकडे शर्मिला टागोर यांच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली होती. त्यांनी आपल्या आईकडे शर्मिला यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र साजिदा सुल्तान या नात्यासाठी तयार नव्हत्या. कारण शर्मिला या बंगाली होत्या. लग्नासाठी परवानगी मिळवण्यासाठी साजिदा यांनी नवाब पतौडी आणि शर्मिला यांच्यासमोर एक अट ठेवली. ती म्हणजे लग्नापूर्वी शर्मिला यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा. धर्मांतर करुनच त्या नवाब पतौडीसोबत लग्न करु शकतील, असे त्यांनी म्हटले. शर्मिला यांनी ही अट मान्य केली आणि लग्नापूर्वी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. यासाठी त्यांचे नाव बदलून आयशा सुल्तान असे ठेवण्यात आले.

 

भोपाळजवळील नवाब शिकारगाहवर करण्यात आले धर्म परिवर्तन
इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट मान्य केल्यानंतर शर्मिला टागोर आपल्या भावी सासूबाईंना भेटायला भोपाळला आल्या होत्या. तेव्हा भोपाळमध्येच त्या धर्म परिवर्तन करतील, असे ठरवण्यात आले. यासाठी भोपाळ जवळील नवाब घराण्याच्या चिकलोद कोठीची निवड करण्यात आली. पूर्वी भोपाळचे नवाब या कोठीत शिकारीसाठी जायचे.

 

करीना कपूरने बदलला नाही आपला धर्म
शर्मिला टागोर यांनी आपल्या सासूबाईंच्या सांगण्यावरुन इस्लामचा स्वीकार केला. मात्र त्यांनी ही अट आपल्या सूनबाई करीना कपूरला घातली नाही. सैफसोबत लग्न ठरले, तेव्हा करीनासुद्धा आपला धर्म बदलणार असल्याची चर्चा होती. मात्र स्वतः शर्मिला टागोर आणि सैफ अली खान यांनी करीना धर्म बदलणार नसल्याचे सांगून या चर्चांना पूर्णविराम दिला होता. शर्मिला यांनी मीडियाला सांगितले होते, की सैफची बेगम ही हिंदू आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, नवाब पतौडी आणि शर्मिला टागोर यांची अतिशय जुनी छायाचित्रे...
 

बातम्या आणखी आहेत...