Home | National | Other State | BDO officer Shailendra Singh will be on duty on the day of His marriage

ना हुंडा ना बँड-बाजा, लग्नाच्या दिवशीही हा ऑफिसर असणार ड्यूटीवर; म्हणाला आधी ऑफिस मग लग्न; हुंड्यावर दिले चपराक उत्तर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 06:56 PM IST

अधिकारी नवऱ्याने सांगितले - सॅलीर इतकी मिळते की परिवाराला आरामात सांभाळू शकतो

 • BDO officer Shailendra Singh will be on duty on the day of His marriage

  नौतन/बेतिया (बिहार) - बिहार जिल्ह्यातील नौतन येथील बीडीओ शैलेंद्र कुमार सिंह वेगळ्या अंदाजात लग्न करणार आहेत. 10 डिसेंबर रोजी असणाऱ्या या लग्नाची पूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. या लग्नात बँड-बाजा वाजणार नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे शैलेंद्र कुमार यांनी आपल्या लग्नादिवशी देखील सु्ट्टी घेतलेली नाहीये.

  हुंड्यावर दिले चपराक उत्तर

  शैलेंद्र कुमार ऑफिसमधील दिवसभराचे काम आटोपून संध्याकाळी बँड-बाजा विना वऱ्हाड घेऊन समस्तीपूर जिल्ह्यातील ममताशी विवाह करण्यास जाणार आहे. शुक्रवार रोजी त्यांच्या घरी मंगलगीत सुरू असताना ते ड्यूटीवर कार्यरत होते. तसेच हुंडा घेण्यावर त्यांनी सांगितले की माझा हुंडा घेण्यास विरोध आहे. मी सध्या बीडीओच्या पदावर असून चांगली सॅलरी असल्यामुळे परिवारासोबत आरामात राहू शकतो. समाजातील लोकांनाही दिसू द्यावे की, पदाधिकारी देखील हुंडाविरोधी आहे. नवरी हाच खरा हुंडा आहे.

  समाजाचा सहभाग अपेक्षित

  > त्यांनी सांगितले की, साधारण लोक हुंडा देणे-घेणे सोडत आहेत. माझ्या या पुढाकारातून काही लोकांनी धडा घेतला तर सरकारी योजनांना बळ मिळेल. हुंड्यातून येणाऱ्या पैशातून कोणत्याच प्रकार विकास होत नाही. आपल्याला ही प्रथा बंद केली पाहीजे. हुंडा समाजाला लागलेली एक कीड आहे. आपल्याला हुंडारूपी कीडीला दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्व लोकांचा सहभाग असणे गरजेचे आहे.

  समाजाला नवी दिशा देण्यासाठी यांसारख्या अधिकाऱ्यांनी पुढे यायला पाहिजे.
  शैलेंद्र कुमार सिंह यांना समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे. समाजाला नवी दिशा दर्शविण्यासाठी यांसारख्या अधिकाऱ्यांनी पुढे यायला हवे. जेणेकरून सामान्य नागिरक हुंडा देणे-घेण्यामध्ये विश्वास ठेवणार नाहीत. हुंड्यामुळे समाजात दरी निर्माण होत असल्याचे बेतियाचे उपविकास आयुक्त रविंद्रनाथ प्रसाद सिंह म्हणाले.

Trending