Health / पावसाळ्यात राहा मधमाशा आणि डासांपासून सावध 

पावसाळ्यात डास किंवा इतर किडे चावल्यास मलेरिया किंवा त्वचेत संसर्गाचा त्रास होऊ शकतो. जाणून घ्या असे काही उपाय जे केल्यामुळे तुम्ही या किड्यांपासून बचाव करू शकतो. 

दिव्य मराठी वेब

Jul 11,2019 12:10:00 AM IST

पावसाळ्यात डास किंवा इतर किडे चावल्यास मलेरिया किंवा त्वचेत संसर्गाचा त्रास होऊ शकतो. जाणून घ्या असे काही उपाय जे केल्यामुळे तुम्ही या किड्यांपासून बचाव करू शकतो.

किडे-मुंगळे : पावसाळी किडा चावल्यानंतर त्याचा डंख शरीराच्या आतच राहतो त्यामुळे खाज, दाह, सूज होऊ शकते. यापासून आराम मिळण्यासाठी चावलेल्या जागेवर शुद्ध तुपात कापूर बारीक करून लावल्यास आराम मिळतो.


मधमाशी : पावसाळ्याच्या दिवसांत मधमाशी किंवा मुंग्या तुम्हाला चावू शकतात. जर मुंग्या किंवा मधमाशीने डंख मारला असेल तर, घरात असणारी कोणतीही मिंट असलेली वस्तू जसे टूथपेस्ट किंवा चुना लावल्यास आराम मिळतो.


डास : याच्यापासून बचाव करण्यासाठी जाळीचे दरवाजे बंद ठेवा. मुलांना आणि स्वत:ला पूर्णपणे झाकून ठेवा. मुले ज्या वेळी खेळायला जातील त्या वेळी डासांपासून बचाव करणारी क्रीम अवश्य लावा. याशिवाय रात्री मच्छरदाणीमध्ये झोपा.


कोळी : कोळी जर तुमच्या शरीरावर पडला किंवा खूप वेळ त्वचेवर चालत राहिला तर संसर्ग होऊ शकतो. त्या वेळी संसर्ग झालेल्या जागेवर आमचूर किंवा वाटलेल्या आमचुराला पाण्यात मिसळून लावल्यास आराम मिळतो.

X
COMMENT