आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिठाई घेताना रहा सतर्क, कुठे भेसळ तर कुठे अाराेग्याला हानिकारक रंगांचा वापर..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दिवाळीच्या तयारीमध्ये धावपळीच्या काळात घरच्या घरी मिष्ठान्न तयार करण्यासाठी वेळ मिळत नाही. मग नाईलाजाने विकत घेतल्या जाणाऱ्या मिठाई आणि गोड पदार्थांचा पर्याय निवडला जातो. मात्र, या मिठाईचा दर्जा चांगला आहे की नाही हे तपासले जात नाही. विकतचे दुखणे ठरणाऱ्या या मिठाईतील भेसळ नक्की कशी ओळखावी यासाठी काही सोपे उपाय आजमावले जाऊ शकतात. 

 

मिठाई घेताना दुकान मोठे असो किंवा लहान, दुकानातून घेतलेल्या खाद्यपदार्थामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. फक्त भेसळच नाही तर खाद्यपदार्थांना अधिक आकर्षक करण्यासाठी वापरले जाणारे खाद्य रंगदेखील शरिरासाठी हानिकारक असतात. मिठाई जेवढी आकर्षक दिसते तेवढी जास्त ती हानिकारक असू शकते याचा विचारच ग्राहक मिठाई घेताना करत नाहीत.


यामुळे मिठाईमध्ये वापरले जाणारे रंग, खराब प्रतीचा सुकामेवा, रंगांमध्ये असलेले विषारी द्रव्य, चांदीचा वर्ख म्हणून वापरला जाणारा अॅल्युमिनियमचा वर्ख या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होतो. अशी मिठाई विकत घेणे म्हणजे विषाची परीक्षा ठरते. इंग्रजीमध्ये असलेली एक म्हण आहे, स्लो पॉयझनिंग म्हणजेच हळू हळू मारणारी गोष्ट.. या मिठाई किंवा खाद्यपदार्थ अशाचप्रकारे हळूहळू मानवी शरीरामध्ये विष पसरवतात. 


दिवाळीसाठी चांगल्या ठिकाणी घेतलेल्या मिठाईमध्येही वापरले जाणारे खाद्य पदार्थांचे रंग बाहेरून आणले जातात. या ऐवजी नैसर्गिक रंग आणि पूर्णपणे फक्त खव्याचा वापर केलेली मिठाई असावी. हे फरक ओळखण्यासाठी काही खास चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये मिठाई २४ तासांत खराब व्हायलाच हवी, असे न झाल्यास त्या मिठाईमध्ये परिरक्षके अर्थात पेस्टिसाइड वापरल्याचा धोका असतो. यासारख्या साध्या पण घरगुती चाचण्या केल्याने मिठाई चांगली की वाईट हे सहजपणे ओळखू येऊ शकते. 


अन्न भेसळ ओळखण्यासाठी 
- शक्यतो रंगविरहीत मिठाई घेतली जावी. 
- डालडा तुपाचा वापर केलेल्या मिठाई ताज्या दिसतात. टिकणाऱ्या असतात, त्यांच्यामुळे फूड पॉयजनिंगचा धोका उद्भवतो. 
- चांदीच्या ऐवजी अॅल्युमिनिअमचा वर्ख वापरला जाऊ शकतो. 
- पेस्टिसाइड वापरलेल्या मिठाईला मुंग्या लागत नाहीत, ना त्या खराब होतात. 
अन्न भेसळ म्हणजे विषाची परीक्षा.. 
कोणत्याही विकतच्या अन्न पदार्थांमध्ये भेसळ असणे ही आता अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. खरा चांदीचा वर्ख असणारी मिठाई सामान्यांना आणि उत्पादकांनादेखील आता परवडत नाही. त्यामुळे या गोष्टी तपासून घ्यायला हव्या, भेसळ असलेले पदार्थ हे शरीरावर उशिरा पण दीर्घकालीन परिणाम करतात.

- अजित टक्के, मराठी विज्ञान परिषद, नाशिक 
 

घरच्या घरी करायच्या रासायनिक चाचण्या 
- चांदीच्या ऐवजी अॅल्युमिनिअमचा वर्ख असल्यास तो संहत हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये पूर्ण विरघळतो. चांदी विरघळत नाही. 
- खव्याच्या मिठाईवर आयोडीनचे काही थेंब टाकल्यावर काळी झालेली मिठाई भेसळयुक्त आणि रंग न बदललेली चांगली असते. 
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे २४ तासांत मिठाईला बुरशी न लागणे, खराब न होणे, मुंग्या न लागणे म्हणजे तीत पेस्टिसाइड‌्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...