आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यात एकदा हजर व्हा; साध्वी प्रज्ञाला मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी काेर्टाचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाॅम्बस्फाेटाच्या कटात सहभागी असल्याचा आराेप असलेल्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना या प्रकरणात दिलासा देण्यास विशेष एनअायए न्यायालयाने नकार दिला. सुनावणीत गैरहजर राहण्याची परवानगी मिळण्यासाठी साध्वींनी केलेला अर्ज न्या. व्ही. एस. पाडळकर यांनी फेटाळला. आठवड्यात किमान एकदा तरी कोर्टात हजेरी लावण्याची ताकीद दिली.


२००८ मध्ये या बाॅम्बस्फाेटात ७ लाेकांचा मृत्यू झाला हाेता, तर १०० हून अधिक लाेक जखमी झाले हाेते. या कटात सहभागाचा आराेप साध्वीसह कर्नल पुराेहित, स्वामी असीमानंद यांच्यावर हाेता. या प्रकरणात ९ वर्षे तुरुंगवास भाेगलेल्या साध्वी यांनी आजारपणाचे कारण देत जामीन मिळवलेला आहे. लाेकसभा निवडणुकीत त्या भाेपाळमधून भाजपच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. ‘खासदार म्हणून निवडून आल्यामुळे मला लाेकसभेतील कामकाज पूर्ण करायचे असल्याने सुनावणीत गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी,’ असा अर्ज साध्वींनी केला हाेता. मात्र ‘या खटल्याच्या सुनावणीत साध्वींची उपस्थिती आवश्यक आहे,’ असे सांगत न्यायमूर्तींनी अर्ज फेटाळला. ‘जामीन अर्ज मंजूर करतेवेळी साध्वींनी खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्याची हमी दिली आहे, त्यामुळे आता त्यांना काेणतेही कारण देऊन गैरहजर राहता येणार नाही,’ असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...