अॅशेस / पावसाळ्यात अॅशेस झाल्याने इंग्लंडमध्ये अधिक लोकप्रिय झाले बीच क्रिकेट; महिला-पुरुष एकाच संघात; पावसातदेखील सामना राहताे सुरू

ऑस्ट्रेलियाच्या अॅशेस मालिकेदरम्यान आयसीसीने इंग्लंडमध्ये बीच क्रिकेटचे छायाचित्र ट्विट केले
 

Sep 17,2019 02:04:40 PM IST

लंडन - आयसीसीने नुकतेच ट्विटर अकाउंटवर एक छायाचित्र पोस्ट केले, ज्यात छोट्या-मोठ्या वयाचे अनेक लोक समुद्रकिनारी क्रिकेट खेळत आहेत. छायाचित्र पाहून युजर आश्चर्यात पडले, हे कोणत्या प्रकारचे क्रिकेट. हे बीच क्रिकेट असून जे इंग्लंड व वेस्ट इंडीजमध्ये खूप लोकप्रिय झाले. इंग्लंडमध्ये यंदा पावसाळ्यात प्रतिष्ठित अॅशेस कसोटी मालिका खेळवली जात आहे. त्यामुळे बीच क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढली.


हा खेळ समुद्रकिनारी खेळत असेल तरीदेखील लोक पांढरी किट घालून खेळतात. बीच क्रिकेटचे नियमदेखील वेगळेच आहेत. काही गल्ली क्रिकेटसारखे वाटतात. महिला-पुरुष एकाच संघाकडून खेळतात. जी टीम सर्वाधिक धावा काढते ती पुढच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करते. चेंडू बिनाटप्पा टाकायचा. कारण वाळूवर चेंडू उसळी घेत नाही. चेंडू हरवला किंवा समुद्राच्या जवळ गेल्यावर चेंडू परत येईपर्यंत पळून धावा घेता येतात.

एकमेव सामना, जो पावसातदेखील चालतो
> एका संघात कितीही खेळाडू असू शकतात. महिला-पुरुष एकत्र खेळतात.
> टीम कधी ही डाव घोषित करून विरोधी संघाला फलंदाजी देऊ शकते. जवळापास १०० धावा झाल्यावर टीम डाव घोषित करते.
> वाइड, नो बॉल, पायचीतसारखे बाद होण्याचे नियम नाही
> फलंदाज केवळ ३ प्रकारे बाद होऊ शकतो- झेल, त्रिफळाचित, धावबाद.
> खेळाडूंना आपले आणि संघाच्या धावा स्वत: मोजाव्या लागतात.
> क्षेत्ररक्षकाने एका हाताने झेल घेतल्यास संपूर्ण संघ बाद होतो, गडी शिल्लक असेल तरीही.
> पाऊस आल्यास सामना थांबत नाही.

X