आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Beach Photos Posted By Mandira Bedi From Maldives, Fans Say 'This Is Really You'

मालदीवमधून मंदिरा बेदीने पोस्ट केले बीचवरचे फोटोज, फॅन्स म्हणाले - 'ही खरोखरीच तू आहेस' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या मालदीवमध्ये आपल्या सुट्या एन्जॉय करत आहे. ती अशातच हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेली आहे आणि तिथून तिचे बीचवरचे काही फोटोज तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मंदिरा बेदी फिटनेसच्या बाबतीत नेहमीच खूप सजग असते. ती या फोटोमध्येही खूप फिट अँड फाईन दिसत आहे. तिने स्कार्लेट बिकिनी परिधान केली आहे आणि त्यावर मॅचिंग हेअरबॅन्ड लावले आहे आणि मगे असलेली माती तिच्या या फोटोला आणखीच सुंदर बनवत आहे. मंदिराने आपला फोटो शेअर करून त्यावर कॅप्शन दिले आहे, "आजचा हा संपूर्ण दिवस खूप सुंदर आहे.. सूर्यप्रकाश आणि निळेशार समुद्र... यापेक्षा आनंदी जागा माझ्यासाठी दुसरी असूच शकत नाही..." 

 

 

 

मंदिराचे इंडस्ट्रीतील इतर फ्रेंड्स म्हणजेच मौनी रॉय, श्रिया सारण, मारिया गोरटी आणि विद्या मालवदे यांनी लगेच मंदिराच्या फोटोजवर लाईक केले. तसेच तिच्या चात्यांनाही मंदिराचा हा लूक खूपच आवडला आणि तिच्या या फिटनेसच्या वेडाचे सर्वांनी कौतुक केले आणि तिच्या फोटोजवर खूप कमेंट्स केल्या.