आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bear Grylls Revealed After Shooting With Rajinikanth 'He Was Not Injured, He Is Too Brave'

रजनीकांत यांच्यासोबत शूटिंग केल्यानंतर बिअर ग्रिल्सने केला खुलासा - 'जखमी झाले नव्हते थलायवा, ते खूप शूर आहेत'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचे बिअर ग्रिल्सच्या नव्या शोच्या शूटिंगनंतरचे काही फोटो समोर आले आहेत. बिअर ग्रिल्सचा हा नवा शो आहे. ज्याचे नाव 'इन टू द वाइल्ड विद बिअर ग्रिल्स' आहे. याची माहिती स्वतः बिअरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. रजनीकांत या शोद्वारे टीव्ही डेब्यू करत आहेत.  

शूर आहेत रजनीकांत... 

बिअरने आपल्या इंस्टास्टोरीवर रजनीकांत यांच्यासोबतचे फोटो शेअर करून लिहिले, "पीएम मोदी यांच्यासोबतच्या एपिसोडनंतर सुपरस्टार रजनीकांत आम्हाला जॉईन करणार आहेत. ते टीव्हीवर आपला डेब्यू आमचा नवा शो 'इन टू द वाइल्ड विद बिअर ग्रिल्स' सोबत करणार आहेत. हा शो डिस्कवरी चॅनलवर प्रसारित होईल. त्याने हेदेखील लिहिले की, ते जखमी झाले नव्हते. ते खूप शूर आहेत." डिस्कवरी चॅनलवर टेलीकास्ट होणाऱ्या शोचे शूटिंग मंगळवारी कर्नाटकच्या बांदीपुर टायगर रिझर्व्हमध्ये केले गेले.  

एका रिपोर्टनुसार, "28 आणि 30 जानेवारी रोजी दररोज खास पाहुण्यांसाठी 6 तासांच्या चित्रिकरणाची परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारी याठिकाणी रजनीकांत शूटिंग करणार आहेत, तर अक्षय कुमार 30 जानेवारीला येणार असून तो त्याच शोसाठी चित्रिकरण करणार असल्याची शक्यता आहे. सुलतान बाटोरी महामार्ग आणि मैलाहल्ली, मुदार आणि काळकरे रेंजसाठी शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. ते पर्यटन-नसलेल्या क्षेत्रामध्ये शूटिंग करणार आहेत, जे विशेष वन संरक्षणाखाली असतील.

गेल्या वर्षी प्रसारित झाला होता मोदी स्पेशल एपिसोड

नरेंद्र मोदींवर चित्रीत झालेला 'मॅन vs वाइल्ड' भागाचे उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये चित्रीकरण करण्यात आले. हा एपिसोड गेल्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी प्रसारित झाला होता.