आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्‍त्‍यात एकमेकींच्‍या जीवावर उठल्‍या दोन सख्‍ख्‍या बहिणी, मारहाणीचा Video Viral

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाकोर (गुजरात) - मध्‍य गुजरातमधील डाकोर येथे दोन मुलींनी भरस्‍त्‍यात एकमेकांना जबरदस्‍त मारहाण केल्‍याची घटना घडली आहे. त्‍यांच्‍यामधील मारहाण ऐवढी भीषण होती की, दोघींही एकमेकांच्‍या अक्षरश: जीवावर उठल्‍या होत्‍या. त्‍यामुळे रस्‍त्‍यातील इतर लोकांना त्‍यांच्‍या भांडणामध्‍ये पडण्‍याची हिंमत होत नव्‍हती. 10 ऑगस्‍टरोजी ही घटना घडली. त्‍यांनतर त्याचा व्हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर ही घटना समोर आली.


या कारणांमुळे बहिणींनी एकमेकांना केली मारहाण
डाकोरचे पोलिस अधिकारी आर. बी. चावडा यांनी सांगितले की, व्हिडिओत एकमेकांना मारहाण करणा-या दोन्‍ही मुली मुळत: महाराष्‍ट्रातील आहेत. डाकोर येथे एका मंदिर दर्शनासाठी या दोन्‍ही बहिणी गेल्‍या होत्‍या. तेव्‍हा मोठ्या बहिणीने आपला मुलगा सांभाळण्‍यासाठी छोट्या बहिणीकडे दिला होता. मात्र काही वेळाने तो गायब झाल्‍या. यामुळे दोघांतही सुरूवातीला कडाक्‍याचे भांडण झाले. बघता बघता त्‍यांनी एकमेकांना मारहाण करण्‍यास सुरूवात केली. मात्र थोड्या वेळाने मुलगा सापडल्‍यानंतर त्‍यांनी आपले भांडण थांबवले.

 

 

बातम्या आणखी आहेत...