पाकव्याप्त काश्मिरातील हुंजा / पाकव्याप्त काश्मिरातील हुंजा खाेरे इतके सुंदर अन‌् आरोग्यदायी, की येथील लाेक शंभर वर्षे जगतात!

प्रतिनिधी

Jan 21,2019 01:29:00 PM IST

गर फिरदौस बर रुए जमीं अस्त, हमीं अस्त, हमीं अस्त, हमीं अस्त... अर्थात पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे. मोगल बादशहा जहांगीरने या ओळी उद्धृत केल्या तेव्हा पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग होता. तिथलीच ही कथा...


गिलगिट पाकिस्तान. म्हणजे, पाकिस्तानचा उत्तर भाग. दक्षिणेत आझाद काश्मीर, पश्चिमेस खैबर पख्तुनख्वा, उत्तरेत अफगाणिस्तानचा वखान, पूर्व व ईशान्येत चीनचा शिनजियांग व आग्नेय दिशेस भारताच्या जम्मू-काश्मीर सीमेपर्यंत विस्तारलेला पाकिस्तानचा हा काश्मीर. स्वातंत्र्योत्तर काळात भारत व पाकिस्तानात वादाचा मुद्दा ठरलेला हाच तो प्रदेश. मात्र, या प्रदेशाची वेगळी माहिती आपण जाणून घेऊ. गिलगिट बाल्टिस्तानातील हुंजा खोरे पीओकेतील सर्वात सुंदर व आकर्षक प्रदेश आहे. फोर्ब्जने २०१९ मध्ये सर्वात थंड ठिकाणास भेट देणाऱ्या यादीत त्याचा समावेश केला आहे. हंुजाला जेवढे सौंदर्य आहे तेवढे निरोगी वातावरणही लाभले आहे. परिणामी येथील लोक सरासरी शंभर वर्षांहून जास्त काळ जगतात. पाकिस्तानच्या अन्य भागाच्या तुलनेत येथील साक्षरतेचे प्रमाणही जास्त आहे. गेल्या ११ महिन्यांत येथे सुमारे १२ लाख पर्यटकांनी भेट दिली. गिलगिट बाल्टिस्तान पर्यटन विभागाचे सहायक संचालक मुबाशिर अय्युब म्हणाले, २०१९ मध्ये २५ लाख पर्यटक येण्याची आशा बाळगून आहोत. सुविधा पुरवल्यास दरवर्षी स्थानिक व्यवसाय १०० कोटी रुपयांच्या पुढे जाईल. सरकार येथे राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम आयोजित करते. उदा. विंटर एक्स्पो, लोक विरसा टुरिझम फेस्टिव्हल, सरफरंगा डेझर्ट जीप रॅली, जी सर्वाधिक उंचीवर होणारी डेझर्ट जीप रॅली होती. देओसईमधील संस्कृतीशी संबंधित अल्तीती व बलतीत फोर्ट हुंजा येथे आहेत. शिगर किल्ला व खापलू किल्ला बाल्टिस्तानमध्येच आहे. स्कर्दूचा प्रसिद्ध धबधबा, येथे दिसताे. नलतार हुंजा खाेरे येथील स्कीइंग डेस्टिनेशन आहे. नलतार स्कीइंग रिसॉर्ट काराकोरम रेंजस्थित पाकचा उंच स्कीइंग स्पॉट आहे. हा ९,६८० फूट उंचावर असून पाकचे स्कीइंग फेडरेशनचे प्रमुख केंद्रही आहे. २०१५ पासून चेअरलिफ्टची सुविधा दिली जाते.


जगातील काही ठिकाणे ब्ल्यू झोन संबोधली जातात, जिथे वयोमान खूप जास्त असते. हुंजाचा समावेश आहे.


येथील लोक इ.स.पूर्व चौथ्या शतकात आलेल्या सिकंदराच्या सैनिकांचे वंशज मानतात. त्यांना बुरुशो म्हटले जाते.

X
COMMENT