Home | Khabrein Jara Hat Ke | Beautiful Photos That Will Change Your Perception

वेगळेच जग दाखवतात हे फोटोज, घटनेकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलून टाकतात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:30 AM IST

सोशल मीडियावर असे अनेक फोटोज शेअर होत असतात, जे एक वेगळेच जग आपल्‍या समोर आणतात.

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  सोशल मीडियावर असे अनेक फोटोज शेअर होत असतात, जे एक वेगळेच जग आपल्‍या समोर आणतात. त्‍यांना पाहून एखाद्या गोष्‍टीकडे पाहण्‍याची दृष्‍टीच बदलून जाते तर अनेकदा आतापर्यंत उजेडात न आलेल्‍या गोष्‍टीही आपल्‍या ध्‍यानात येतात. आज आम्‍ही तुम्‍हाला जगभरातील असेच काही फोटोज दाखवणार आहोत. यातील प्रत्‍येक फोटोजमागे एक अनोखी कहाणी आहे.


  न्‍यूयॉर्क शहराची कहाणी सांगणारा फोटो
  आज आपण ज्‍या न्‍यूयॉर्क शहराला पाहतो, 35 वर्षांपूर्वी ते तसे नव्‍हते. तेव्‍हा न्‍यूयॉर्कमध्‍ये इमारतींचे जंगल नव्‍हते तसेच रस्‍त्‍यावंर गाड्यांची गर्दीही नव्‍हती. वरील फोटोला पाहून तुम्‍हाला अंदाज येईल की, हे शहर तेव्‍हा किती निवांत, शांत होते. अवघ्‍या 35 वर्षांमध्‍ये हे शहर प्रचंड बदलले आहे.


  पुढील स्‍लाइडवर पाहा, असेच काही फोटोज...

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  बुर्ख्‍याआड नाचणारे स्‍वप्‍न 
  या फोटोने अनेकांचे लक्ष आपल्‍याकडे वेधले आहे. यातील सर्व तरुणी शॉर्टस आणि जेगिंग्‍समध्‍ये हुला हुप करत आहे. एका बुरखाधारी युवतीलाही हुला हूप करण्याचा मोह आवरला नाही  आणि बुरख्‍याचे बंधन झुगारुन देऊन तिने ते पूर्णही केले.  

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  पहिल्‍या दृष्‍टीक्षेपात हा एका लहान टेकडीचा फोटो वाटतो. मात्र काळजीपूर्वक पाहिले तर लक्षात येईल की यावर एक हत्‍ती उभा आहे. खूप दुरुन हा फोटो काढल्‍यामुळे हत्‍ती मुंगीपेक्षाही लहान दिसत आहे. 
   

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  बाईलेटरल गाइनाड्रामॉर्फ फुलपाखराचा हा फोटो आहे. म्हणजेच हे फुलपाखरु अर्धे मेल आणि अर्धे फिमेल आहे. फोटोवरुन तुम्‍ही याला सहज ओळखू शकता. ही प्रजाती अत्‍यंत दुर्मिळ अशी आहे. 
   

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  दिव्‍याखाली अंधार  
  विकासाचे खरे रुप दाखवणारा हा फोटो आहे चीनमधील. उंचच उंच, वीजेंच्‍या रोषणाईने झगमगणा-या  इमारतींने तेथील झोपड्यांना अगदी झाकून टाकले आहे. मात्र फोटोग्राफरने हे वास्‍तव अतिशय प्रभावीरीत्‍या समोर आणले आहे. 

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  लोकांना डोंगर, द-याखो-यात हायकिंग करताना तुम्‍ही अनेकदा पाहिले असेल. मात्र फोटोतील हे लोक ग्‍लेशियरवर चढण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. ग्‍लेशियरमध्‍ये प्रंचड थंडी असते. त्‍यामुळे तेथे चढाई करणे, खूप कठीण असते.
   

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  पाडसांना भूख लागल्‍यावर हरिणीने त्‍यांना रस्‍त्‍यातच दुध पाजायला सुरुवात केली. रस्‍त्‍यावरुन गाड्या जात आहेत. याकडेही हरिणीने लक्ष दिले नाही. अखेर मानवजात असो की प्राणीजात आई ही आई असते.

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  प्राणी अभयारण्‍यात फिरण्‍यासाठी आलेल्‍या या महिलेशी हत्‍तीच्‍या पिलाची इतकी मैत्री झाली की, नंतर तो तिला अभयारण्‍यातून जाऊच देईना. ते पिलू त्‍या महिलेवरच पडले व तिच्‍याशी मस्‍ती करु लागले. 

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  1995मध्‍ये क्रिस्‍टोफर चार्ल्‍सला कोर्टात अशा पद्धतीने बांधण्‍यात आले होते. याचे कारण म्‍हणजे सुनावणी दरम्‍यान ते कोर्टात ते प्रचंड गोंधळ घालत होते. त्‍याच्‍यांवर कॅन्सर पेशंटच्‍या मर्डरची केस होती. या केसमध्‍ये त्‍यांना मृत्‍यूची शिक्षा सुनावण्‍यात आली होती. 
   

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  1890 मध्‍ये पहिल्‍यांदा फोटो काढून घेताना एक महिला. तिच्‍या चेह-यावर आनंद आणि आश्‍चर्य दोन्‍हीही दिसत आहे. 
   

 • Beautiful Photos That Will Change Your Perception

  उकाड्याने त्रस्‍त वाघोबा चिखलातून बाहेर आले तेव्‍हा असे दिसत होते.

Trending