Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Beauty Benefits Of Turmeric

7 दिवसात वाढेल त्वचेचा ग्लो वाढवायचा आहे का? ट्राय करा या 2 STEPS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:00 AM IST

ब्यूटी एक्सपर्ट रश्मी शीतलानी सांगत आहेत टीप्स

 • Beauty Benefits Of Turmeric

  हळदीमध्ये करक्यूमिन सारखे अँटीऑक्सीडेंट्स असतात. हे त्वचेवर लावल्याने ब्यूटी रिलेटेड अनेक समस्या दूर होतात. यामधील अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज ब्यूटी वाढवण्यात मदत करतात. यासाठीच ब्यूटी एक्सपर्ट रश्मी शीतलानी रोज हळ्दीचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्यांच्यानुसार हळद मधामध्ये मिसळून लावणे जास्त फायदेशीर असते. हळ्दीमध्ये मध मिसळल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहतो. यामुळे स्किन टाइट होते. हळद आणि मध कशा प्रकारे उपयोगात आणल्याने फायदा होईल याविषयी रश्मी सांगत आहेत.

  1. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मध मिसळा. हे पाण्यात मिक्स करुन घ्या.

  2. हे पाणी आइस ट्रेमध्ये टाकून फ्रीजरमध्ये ठेवा. दोन तासांनंतर याचे आइस क्यूब तयार होतील. हे क्यूब्स हकल्या हातांनी चेह-यावर दोन मिनिटे रफ करा.


  चेह-यावर रफ केल्याने होतील 5 फायदे
  - यामुळे चेह-याचा ग्लो वाढतो. स्किन सॉफ्ट होते.
  - यामुळे त्वचेच्या डेड सेल्स निघून जातात. रंग गोरा होतो.
  - यामुळे स्किन टाइट होते. रिंकल्स ठिक होतील.
  - यामुळे पिंपल्स ठिक होतात. चेह-याचे डाग दूर होतात.
  - यामुळे सुरकूत्या ठिक होतात.

Trending