आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: रशियाची ब्युटी क्वीन या देशाच्या King सोबत विवाह करून बनली खरीखुरी Queen

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियातील ब्युटी क्वीन खऱ्या आयुष्यात आता एक क्वीन बनली आहे. तिने मलेशियाचे सुल्तान मुहम्मद फारिस यांच्याशी विवाह करून इस्लाम धर्म स्वीकारला. रशियात झालेल्या या शाही विवाहानंतर ती मलेशियाची राणी बनली आहे. ओक्साना वोएवोदिना असे तिचे नाव असून तिने 2015 मध्ये मिस मॉस्को टायटल जिंकला होता. तिचे वडील एक डॉक्टर आहेत. तिने रशियासह थायलंड आणि चीनमध्ये सुद्धा प्रोफेशनल मॉडेल म्हणून काम केले आहे.

 

- हा शाही विवाह सोहळा रशियात 22 नोव्हेंबर रोजी पार पडला. या विवाहात अल्कोहोलवर बंदी होती तसेच पाहुण्यांना केवळ हलाल जेवण देण्यात आले. 

- मुहम्मद फारिस यांना 2016 मध्ये मलेशियाचे सुल्तान करण्यात आले. 49 वर्षांचे सुल्तान फारिस आणि ब्युटी क्वीन ओक्साना (25) यांच्या वयात 24 वर्षांचे अंतर आहे. 
- लग्नात सुल्तानने पारंपारिक मलेशियन पोशाख घातला होता. तर ओक्सानाने व्हाइट रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला होता. या लग्नासाठी तिने वर्षभरापूर्वीच आपले धर्म बदलून इस्लाम धर्म स्वीकारला होता. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर हिजाबचा फोटो देखील पोस्ट केला. मलेशियात नागरिकांनी आपल्या महाराणीचे जंगी स्वागत केले. तसेच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


डॉक्टरची मुलगी आहे ब्युटी क्वीन
- ब्यूटी क्वीन ओक्साना विषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. सोशल मीडियावर तिने यापूर्वी टाकलेले ग्लॅमरस फोटो सुद्धा डिलीट केले आहेत. तरीही रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार, तिने एलीट प्लेकानोव रशियन विद्यापीठातून ऑफ इकोनॉमिक्समधून बिझनेसचे शिक्षण घेतले. 
- तिचे वडील आणि ती आपली अडनावे वेग-वेगळे लिहितात. वडील अॅन्ड्री गोर्बातेनको एक ऑर्थो सर्जन आहेत. तर आई सुद्धा एक ग्लॅमरस मॉडेल होती. 

बातम्या आणखी आहेत...