आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू साउथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे राजधानी सिडनीत पसरला धूर, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यू साउथ वेल्सच्या जंगलात मागील तीन आठवड्यांपासून आग लागलेली आहे
  • नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दक्षिण गोलार्धात गर्मी असते, त्यामुळे ऑस्ट्रेलियात आग लागणे सामान्य आहे

सिडनी- ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्सच्या जंगलात अंदाजे एका महिन्यापूर्वी लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण आणता आले नाहीये. या आगीमुळे राज्यातील काही मोठ्या शहरात प्रदुषणाची समस्या वाढली आहे. आज सकाळपासून सिडनीमध्ये सर्वत्र धूर पसरला आहे. हवेमुळे जंगलातील धूर शहरापर्यंत पसरला. यामुळे शहरातील एयर क्वालिटी धोक्याच्या स्थरापर्यंत पोहचली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना आपल्या घरातच राहणायेचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर धुराचे फोटोज व्हायरल
 
सोशल मीडियावर सिडनीमध्ये पसरलेल्या धुराचे फोटोज व्हायरल होत आहे. सिडनीमधील नागरिकांचे म्हणने आहे की, सकाळी जाग आल्यापासून त्यांना घराबाहेर सर्वत्र धूर दिसत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा धूर काही दिवस असाच राहणार आहे. सिडनीमध्ये अंदाजे 50 लाख लोक राहतात. स्थानिक मीडियानुसार काही भागांमध्ये प्रदषणाचा स्तर राष्ट्रीय मानकांपेक्षा 8 पट जास्त झाला आहे. वाढत्या गर्मीमुळे ही आग वाढण्याची शक्यता आहे. न्यू साउथ वेल्सशिवाय क्वींसलँडमध्येही आगीने हाहाकार माजला आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्यातही फायर वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांनी घरात आग न लावण्याचा सल्ला दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...