आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीचा कट लागल्यामुळे महिलेस मारहाण करणाऱ्यास चोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - टॉवर चौकाजवळ असलेल्या काँग्रेस भवनाकडून विरुद्ध दिशेने दुचाकीवर येत असलेल्या एकाने दुचाकीस्वार माय-लेकाला कट मारला. स्वतःची चूक असतानाही विद्यार्थ्यासह महिलेसोबत वाद घालून दोघांना शिवीगाळ व महिलेस मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने मदतीसाठी इतरांना आवाज देताच नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला. याप्रकरणी शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

 

देवीदास कॉलनीत राहणाऱ्या कल्पना प्रेमदास बोरसे (वय ४१) ह्या मुलगा सागर याच्यासोबत दुचाकीने मनपामध्ये जात होत्या. काँग्रेस भवनाच्या इमारतीजवळ विरुद्ध दिशेने महेंद्र गणेश राणा (रा.धनाजी काळेनगर) हा दुचाकीसमोर आला. दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून महेंद्रने सागरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कल्पना बोरसे यांनी त्याला विरोध केला. संतापात असलेल्या महेंद्रने कल्पना यांना रस्त्यावरच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली. कल्पना यांनी मदतीसाठी नागरिकांना आवाज दिल्यानंतर इतरांनी धाव घेतली. नागरिकांनी महेंद्रला पकडून चांगलाच चोप दिला. 


याप्रकरणी कल्पना बोरसे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रस्त्यावर मारहाण करणारा महेंद्र राणा हा शहर पोलिस ठाण्यामध्ये आल्यानंतर तक्रार न करण्यासाठी महिलेच्या विनवण्या करीत होता. 

बातम्या आणखी आहेत...