आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Because Of The Dispute She Asked For Court Help; The Judge Sat The Girl In His Chair And Said Just Give Order ... Girl Ordered, Parents Should Never Fight

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलहामुळे तिने मागितली कोर्टाची मदत; जजनी आपल्या खुर्चीवर बसवून सांगितले -तूच आदेश दे... मुलीने आदेश दिला, आई-बाबांनी कधीच भांडू नये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भोपाळमध्ये शाळेतून थेट विधी प्राधिकरणात गेलेल्या विद्यार्थिनीने केली आई-वडिलांचीच तक्रार
  • न्यायालयीन इतिहासातील अनोखे प्रकरण : मुलीच्या आदेशानंतर कोर्टात उपस्थित माता-पित्याचे डोळे पाणावले, जज म्हणाले, मुलीने दिलेला हाच आदेश लागू होईल

​​​​​​भोपाळ : वडिलांचा नेहमीचा संताप आणि घरातील कलहाला कंटाळून एका १६ वर्षीय मुलीने जिल्हा विधी प्राधिकरणात तक्रार करून मदत मागितली. शुक्रवारी ही मुलगी शाळेतून थेट प्राधिकरणात पोहोचली. तेथील कार्यकारी जज आशुतोष मिश्रांकडे तिने तक्रार नोंदवली. या नेहमीच्या भांडणामुळे मला नैराश्य येत आहे, मला मदत करा, असे तिने विनवले. जजनीही अनोखा मार्ग काढला. अगोदर त्यांनी समुपदेशनातून मुलीस तिच्या आई-वडिलांना प्राधिकरणात बोलावण्यास राजी केले. नंतर आई-वडिलांसमोर मुलीस आपल्या खुर्चीत बसवून, तूच निकाल दे, असे सांगितले. मुलीनेही हिंमत केली आणि निकाल दिला. हा निकाल ऐकून आई-वडिलांचे डोळे पाणावले. जजनीही मुलीने दिलेल्या निकालाचा आदेश काढला.

बाबा मारहाण करणार नाहीत... मुलीचा आदेश
मुलीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आई-बाबा आता कधीही भांडणार नाहीत. शाळेची फीस बाबा नियमित भरतील. कधीही मारहाण करणार नाहीत. जेवणाचे ताट फेकणार नाहीत. किराणा वेळेत भरतील. मुलांच्या गरजा वेळेत पूर्ण करतील. आईला खर्चासाठी काही पैसे देतील.

बाबा संतापी आहेत, फेकाफेकी करतात...
मुलीने जजना सांगितले, की ती मिसरोद भागात राहते. तिचे वडील एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. वृत्तपत्रातून तिने जिल्हा विधी प्राधिकरणाबाबत वाचले आणि ती तक्रार घेऊन आली. प्राधिकरणानेही घाबरलेल्या या मुलीचे समुपदेशन केले. दुसरीकडे पित्यानेही आपल्या चिडखोरपणामुळे कुटुंब अस्वस्थ होत असल्याचे सुनावणीदरम्यान मान्य केले. गावी वृद्ध माता-पित्यास सतत पैसे पाठवावे लागतात म्हणून आपण नेहमी तणावात असतो हे मान्य करून मुलीच्या पित्याने हेच आपल्या चिडखोरपणाचे मुख्य कारण असल्याचे सांगितले. प्राधिकरणाचे सचिव आशुतोष मिश्रा यांनी सांगितले, निकालानंतर या मुलीत आत्मविश्वास वाढला आहे. आता ती स्वत: कुटुंबाचे समुपदेशन करू शकते. यासाठी प्राधिकरण या मुलीस नि:शुल्क प्रशिक्षण देणार आहे.