Malaria / Monsoon Alert: या 4 पॅरासाइट्समुळे होऊ शकतो अतिशय घातक आणि जीवघेणा मलेरिया

डासांच्या चावल्याने मलेरियासारखे रोग होतात, ज्याचे कारण आहे एक संक्रमित एनोफिलीज डास

दिव्य मराठी

Aug 01,2019 02:45:00 PM IST

डासांच्या चावल्याने मलेरियासारखे घातक आजार होऊ शकतात. याचे कारण एक संक्रमित एनोफिलीज डास आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये संक्रमण झालेल्या डांसांत प्लास्मोडियम पॅरासाइट असतो. ते चावताच शरीर पॅरासाइट शरीरासह रक्तातही प्रवेश करतात. काही दिवसांतच शरीरातील रेड ब्लड सेल्सवर याचे घातक परिणाम दिसून येतात. दोन ते तीन दिवसांतच लाल रक्त पेशींमध्ये परोपजीवींची संख्या कित्येक पटीने वाढते. अशात संक्रमण वाढून रेड ब्लड सेल्स फाटू शकतात.


कोणत्या चार पॅरासाइट्समुळे पसरतो मलेरिया
प्लासमोडियम फेल्किपेरम

हा पॅरासाइट सर्वात घातक आणि जीवघेणा मलेरिया पसरवणाऱ्या पॅरासाइट्सपैकी एक आहे. या पॅरासाइटचे संक्रमण झाल्यास मलेरियात उलट्या होणे, ताप वाढणे, पाठदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, शारीरिक वेदना, थकवा आणि पोटदुखी अशी लक्षणे दिसून येतात.


प्लासमोडियम ओव्हाले
हे पॅरासाइट बहुधा पश्चिम आफ्रीकेत सापडतात. माणसाला चावल्यानंतर दीर्घकाळापर्यंत ते शरीराशी चिटकूनच जिवंत राहतात. त्यामुळे, या पॅरासाइटने धोका दीर्घकाळ आणि अधिक असतो.


प्लासमोडियम
या प्रकारच्या पॅरासाइटच्या संक्रमणाने पीडित रुग्णाला थंडीसह तापीची लक्षणे दिसून येतात. अशा स्वरुपाचा मलेरिया जीवघेणा नसतो. तरीही काळजी घेतलेले अती उत्तम राहील.


प्लासमोडियम वायवेक्स
या पॅरासाइटमुळे शरीरात ताप, सर्दी, थकवा आणि हगवण अशा स्वरुपाची लक्षणे दिसून येतात. भारतात मलेरियाची 60 टक्के प्रकरणे याच पॅरासाइटमुळे समोर येतात.

X