आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीच्या गुडलकला आकर्षीत करू शकतात या 8 गोष्टी, उघडतील भाग्याचे दरवाजे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेडरुम घरातील सर्वात खास भागांपैकी एक भाग आहे. येथे विविध प्रकारच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी असतात. जर तुम्ही हे वास्तुप्रमाणे ठेवले नाही तर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी लक्षात ठेवा बेडरुमसंबंधीत काही सोप्या वास्तु टिप्स...


- बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल आणि आरसा ठेवण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशा सर्वात चांगली मानली जाते. या व्यतिरिक्त इतर दिशेला ड्रेसिंग टेबल ठेवण्यापासून दूर राहावे.


- बाथरूम बेडरूमच्या पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावे. असे नसल्यास बाथरूमच्या दरवाजावर नेहमी पडदा लावलेला असावा.


- बेडरूमचा दक्षिण-पश्चिम कोपरा कधीही रिकामा ठेवू नये. या कोपऱ्यात कोणतीही जड वस्तू उदा. टेबल, खुर्ची ठेवू शकता.


- वास्तुनुसार शांत झोप आणि निरोगी शरीरासाठी झोपताना डोके नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे. इतर दिशेला डोके करून झोपणे शुभ मानले जात नाही.


- बेडरूममध्ये तिजोरी दक्षिण दिशेला अशाप्रकारे ठेवा की, उघडल्यानंतर तिजोरीचे मुख उत्तरेकडे राहील. उत्तर-पश्चिम दिशा किंवा उत्तरेकडे ठेवू नये.


- टीव्ही, एअर कंडिशनर यासारख्या इलेक्ट्रिक वस्तू बेडरूमच्या उत्तर-पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवाव्यात. इतर दिशेला ठेवल्यास या वस्तू लवकर खराब होऊ शकतात.


- बेडरूममध्ये कपडे ठेवण्याची आलमारी उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावी. वास्तुनुसार इतर कोणत्याही दिशेला आलमारी ठेवणे शुभ मानले जात नाही.


- बेडरूममध्ये अभ्यासाची जागा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही दिशेला बसून अभ्यास केल्यास एकाग्रता होत नाही.

बातम्या आणखी आहेत...