आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्यालयात प्लास्टिक कप वापरल्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःवरच लावला 5000 रुपये दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बीड जिल्ह्याचे कलेक्टर आस्तिक कुमार पांडे यांनी सोमवारी प्लास्टिक कप वापरल्याने आपल्या विभागाची चूक झाल्याचे कबुल केले. त्यानंतर त्यांनी स्वतःवर 5 हजार रुपयांचा दंडही लावला.
जिल्हाधिकारी कर्यालयात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या दरम्यान पत्रकारांना चहा देण्यासाठी प्लास्टिक कप वापरण्यात आले. त्या दरम्यान एका पत्रकाराने राज्यात प्लास्टिक बंदी आहे आणि तुम्ही इथे प्लास्टिक कपनमध्ये चहा देत आहात, असा प्रश्न विचारला. त्यानंतर आस्तिक कुमार यांनी प्रकरणाच गांभीर्याने घेतले आणि कर्मचाऱ्यांना प्लास्टिक कप हटवण्याची मागणी केली.आपण अपयशी ठरलो-आस्कित कुमार
 
या प्रकरणानंतर आस्तिक यांनी स्वतःवर 5000 रुपयांदा दंड लावला. ते म्हमाले, "आपण प्लास्टिकवर बंदी घालण्यात अपयशी ठरलो." महाराष्ट्रात सिंगल यूज प्लास्टिक उत्पादनावर संपुर्ण बंदी आहे. इतकच काय तर लोकांच्या मनात जागरुकता आणण्यासाठी निवडणूक आयोगानेही पुढाकार घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना आपल्या प्रचाराच सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे.8 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात दुसरा दंड
 
मागील आठ दिवसात बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील प्लास्टिक बंदीचे उल्लंघन केल्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी एक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी पॉलिथीनच्या पिशवीत पैसे घेऊन आला होता. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर 5 हजारांचा दंड लावला होता.

बातम्या आणखी आहेत...