आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडच्या शेतकऱ्यांची कृषी अायुक्तालयावर धडक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा विमा परतावा मिळावा या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी पुण्यात कृषी अायुक्तालयावर माेर्चा काढला हाेता. १३ नोव्हेंबरपासून हे शेतकरी पुण्यातीलच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर मुक्काम ठोकून होते. मात्र तिथे दाद मिळत नसल्याने त्यांनी अखेर अायुक्तालयावर धडक दिली. गेल्या सहा दिवसांत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने बँकेकडे पाठवलेल्या १ हजार ७५१ शेतकऱ्यांच्या विमा रकमेपैकी १३ हजार ८७८ शेतकऱ्यांची रक्कम अद्यापही त्यांच्या खात्यात जमा न हाेता ती विमा कंपनीकडे परत अाली हाेती. या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी मूळ कागदपत्रे घेऊन शेतकरी विमा कंपनीकडे गले हाेते. मात्र तेथील अधिकाऱ्यांकडून सहकार्य केले जात नसल्याचा या शेतकऱ्यांचा अाराेप अाहे. शासनाने शेतकऱ्यांना विमा न मिळवून दिल्यास २५ नोव्हेंबरपासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला अाहे. बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर संगणकातून खाडाखाेड करून बाेगस विमा दाखवला अाहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचा विमा रखडला अाहे. अशा चोरट्या शेतकऱ्यांवर फौजदारी कारवाई करा व पात्र शेतकऱ्यांना तातडीने रक्कम द्यावी, अशी मागणी किसान सभेचे अॅड. अजय बुराडे यांनी केली.

राज्यपाल, माेदींना ८० रुपये अाहेर


शेतकऱ्यांना मदतीसाठी हेक्टरी ८ हजार तर फळबागांसाठी १८ हजार रुपये मदत जाहीर केली आहे. प्रतिगुंठा ८० रुपये मदत अत्यंत तुटपुंजी अाहे. त्याचा निषेध म्हणून अांदाेलकांनी प्रतीकात्मकरीत्या ८० रुपये राज्यपाल, पंतप्रधान, कृषी आयुक्तांना पाठवले अाहेत. भांडवलदारांना मदत करण्यासाठी ही रक्कम उपयोगी येईल, असे अजित अभ्यंकर म्हणाले.दाेनदा पीक विमा उतरवणे गंभीर गुन्हा


बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी दाेनदा पीक विमा उतरवल्याचे उघडकीस अाले अाहे. हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यामुळे विमा परतावा देताना कंपन्या पूर्ण तपासणी करूनच रक्कम अदा करतात. मात्र तांत्रिक चुका दूर करून प्रामाणिक शेतकऱ्यांना रक्कम दिली जाईल. कंपन्यांना जबाबदारी टाळता येणार नाही, कृषी विभाग त्यासाठी आग्रही आहे. - सुहास दिवसे, कृषी आयुक्त, पुणे
 

बातम्या आणखी आहेत...