आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड लोकसभा मतदारसंघातील निकालासाठी नागरिकांना पाहावी लागणार वाट, हे आहे कारण...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- लोकसभेच्या मतमोजणीची तयारी झाली आहे. गुरुवारी(23मे) सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होईल. व्हीव्हीपॅट मोजणीमुळे विविध मतदारसंघांमध्ये अंतिम निकाल येण्यासाठी उशीर होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील बीडचा निकाल सगळ्यात उशिरा लागणार असल्याचे समोर आले आहे. बीडमध्ये एकूण 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यामुळे चार ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या होत्या. त्याची मतमोजणी करण्यासाठी वेळ लागणार आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीचा निकाल पाहण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे.


बीडमध्ये 36 उमेदवार असले तरी सर्वात मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदारांमध्येच होणार आहे. भाजपकडून दिवंगत खासदार गोपीनात मुंडे यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी प्रचारादरम्यान अनेक वाद पाहायला मिळाले, दोन्ही पक्षांकडून टोकाची टीका करण्यात आली होती. 


मराठवाड्यातील इतर मतदारसंघातील संभाव्य अंदाज
बीड-
मतमोजणी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता, एकूण 36 फेऱ्या
लातूर- मतमोजणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता
उस्मानाबाद- मतमोजणीसाठी सायंकाळी चार वाजण्याची शक्यता, एकूण 27 फेऱ्या 
परभणी- मतमोजणीसाठी सायंकाळी 7 वाजण्याची शक्यता
हिंगोली- मतमोजणीसाठी सायंकाळी चार वाजण्याची शक्यता
नांदेड- मतमोजणीसाठी रात्री 8 वाजण्याची शक्यता
जालना- मतमोजणीसाठी सायंकाळी 7 वाजण्याची शक्यता
औरंगाबाद- मतमोजणीसाठी सायंकाळी चार वाजण्याची शक्यता, एकूण 26 फेऱ्या होणार

बातम्या आणखी आहेत...