आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीवर महिनाभर अत्याचार, महिन्यानंत मुलीनेच आपल्या कुटुंबियांना फोन करुन माहिती दिली

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जानेवारीच्या अखेरीस मुलगी गायब होती

बीड- अल्पवयीन मुलीचे विवाहित तरुणाने अपहरण करत तिला महिनाभर विविध शहरांत फिरवून  अत्याचार केला. दरम्यान, तिनेच कुटुंबीयांशी संपर्क साधून आपली सुटका करण्याची विनंती केली. पेठ बीड पोलिसांनी पीडितेची सुटका करत आरोपीला अटक केली. दरम्यान, पीडितेवर आरोपीच्या भावानेही अपहरणापूर्वी अत्याचार केल्याची बाब चौकशीत समोर आल्याने या प्रकरणीही वेगळा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


आठवीत शिकणारी मुलगी जानेवारी २०२० च्या अखेरीस गायब झाली होती.  बापूराव शिवाजी झणझणे (२९, रा. खांडेपारगाव ता. बीड) हादेखील गायब असल्याचे निदर्शनास आल्यावर वडिलांच्या फिर्यादीवरून २८ जानेवारी रोजी पेठ बीड ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद केला. त्यात बापूराव झणझणेसह त्याचा भाऊ संतोष  व बापूरावची पत्नी रोहिणी यांनाही सहआरोपी केले होते. संतोष व रोहिणीला पोलिसांनी अटक केली होती.  


बापूरावला दोन मुले आहेत. त्याने अल्पवयीन मुलीला मित्राच्या दुचाकीवरून   पळवून नेले. पुणे, कात्रज, आळंदी, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या शहरांत फिरूवून तिच्यावर महिनाभर अत्याचार केला होता.  त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचे कलम वाढवले. अपहरणाापूर्वी संतोष झणझणे यानेही वेळोवेळी अत्याचार केल्याचा दावा पीडितेने केला. त्यामुळे संतोषवर स्वतंत्र गुन्हा नोंद केला गेला.

बातम्या आणखी आहेत...