आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: नगर पालिकेतील भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वातंत्र्यदिनी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- नगर पालिकेतील भ्रष्‍टाचार प्रकरणी बुधवारी स्‍वातंत्र्यदिनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्‍यात आले. पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून एक हाती सत्ता असणाऱ्यांनी केवळ कागदावर योजना दाखवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, नगराध्यक्षांनी गैरकारभाराची सीमाच पार केली असून शहरातील नागरिकांना पालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. शहरात व विस्तारीत भागात समान पाणी पुरवठा केला जात नाही, असे अनेक आरोप यावेळी सत्‍ताधा-यांवर लावण्‍यात आले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, पालिकेचे गट नेते फारूक पटेल, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

 

बीड नगर पालिकेतील गैरकारभार, भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाअधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहासाठी खासबाग येथील जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, स्वछतेसाठी प्रत्येक प्रभागात एक जे. सि. बी. मशीन आणी वाढीव मजूर उपलब्ध करून देण्यात यावेत. शहराला काही भागात ५ दिवसा आड तर काही भागात 8 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. तो पाणी पुरवठा कसलाही भेदभाव न करता सरसकट दोन दिवसा आड करण्यात यावा. विकास कामांन संदर्भातील कागदपत्रे लपवली जातात, ती देण्यात यावीत व अंदाज पत्रकानुसार कामे करण्यात यावेत, आ. जयदत्त क्षीरसागर याना घर क्र.1-3-1789 वर कोणत्याही नियमाचे पालन न करता देण्यात आलेली बांधकाम परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी व कादेशीर कार्यवाही करण्यात यावी, बोगस करण्यात आलेल्या मोमीनपूरा रस्त्याची सखोल चौकशी करून सदरील कामांचे सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्यात द्यावेत. सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या व सध्या चालु असलेल्या कामांची अंदाजपत्रके व मोजमाप पुस्तिका उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.


या धरणे आंदोलनात बबन गवते, जेष्ठ नगरसेवक खदीर भाई जवारिवले, अमर नाईकवाडे, युराज जगताप, दिलीप भोसले, प्रेम चांदणे, भाऊसाहेब डावकर, रमेश चव्हाण, जयतुल्ला खान, सम्राटदादा चोहान, अश्फाक इनामदार, शेख अमेर, अशोक वाघमारे, झुंझार धांडे, खुर्शीद आलम, बरकत पठाण, सय्यद मुजीब, बभैय्यासाहेब मोरे, अनिल जोगदंड, शेख सत्तर भाई, शेख रईस खाज, रंजित पिंगळे, प्रभाकर पोपळे, बिभीषण लांडगे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

 

बातम्या आणखी आहेत...