आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड - तालुक्यातील आहेर वडगाव शिवारात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात बीड ग्रामीण पोलिसांना महिनाभरानंतर यश आले. महिलेच्या संपर्कात असलेल्या आणि स्वत:ला महाराज म्हणवून घेणाऱ्यानेच हा खून केल्याचे समोर आले. मंदिर तयार करून पुजारी म्हणून ठेवण्यासाठी १ लाख ३५ हजार रुपये घेऊन नंतर महिलेने ते पैसे परत न केल्याने या पुजाऱ्याने तिचा खून केल्याचे चौकशीत समोर आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुजित बडे यांनी दिली. शारदा नामदेव आवाड (५३, रा. माळवाडी देवगाव, जि. पुणे) असे मृत महिलेच नाव असून बाळासाहेब बाबूराव ओंबसे (वय ६२, रा. पिंपरखेड ता. जामखेड जि. नगर) असे आराेपीचे नाव आहे. आहेर वडगाव शिवारात ४ ऑक्टोबर २०१९ रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुजित बडे यांनी या प्रकरणी तपास केला.
ओंबसेकडून घेतले होते पैसे
शारदा या मूळ वडवणीच्या रहिवासी असून तिथे त्यांची जमीन आहे. बाळासाहेब बाबूराव ओंबसे हा स्वत:ला बाबा म्हणवून घेणारा व्यक्ती शारदा यांच्या संपर्कात होता. वडवणीच्या जमिनीत मंदिर बांधून ओंबसे याला तिथे पुजारी म्हणून बसवू असे सांगून शारदा यांनी त्याच्याकडून १ लाख ३५ हजार रुपये घेतले होते. मात्र, नंतर ना मंदिर झाले, ना आेंबसेला पुजारी म्हणून तिथे बसण्याची संधी मिळाली. यातून दोघांत वाद होत होते. ते दाेघेही जमीन पाहाण्यासाठी आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादातून बाळासाहेब ओंबसेने गळा आवळून शारदा यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.