आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरात एकटी असल्याचा फायदा घेत महिलेवर तलवारीने हल्ला करून ७० हजार रुपये लुटले

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

गेवराई - घरात एकटी असल्याचा फायदा घेत दोन चोरांनी महिलेवर तलवारीने हल्ला करत तिच्या गळ्यातील पोतीसह ७० हजार रुपये लांबवले. ही घटना शिरूर तालुक्यातील तिंतरवणी येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. चोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गीता अशोक खरमाटे (३०) असे जखमी महिलेचे नाव आहे.गीता खरमाटे यांचे पती मंगळवारी रात्री बाहेर गेल्याने ती एकटीच घरी होती. मंगळवारी बारा वाजेच्या सुमारास दोन चाेरटे त्यांच्या घराच्या भिंतीवरून घरात आले. काही कळायच्या आत दोन्ही चोरांनी गीता यांच्या डोक्यात काठीचा घाव घालून अंगावर तलवारीने वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच चकलांबा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक वार यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेच्या जबाब नोंदवला. चोरांविरुद्ध  गुन्हा नोंदवला.