बीड / बीड तिहेरी हत्याकांड : पोलिस उपनिरिक्षकासह जमादार निलंबित, प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका

शेतजमिनीच्या वादातुन जिवीताला धोका असल्याची तक्रार दिल्यानंतर देखील पोलिसांनी वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई केली नव्हती

दिव्य मराठी वेब

Jul 28,2019 04:45:10 PM IST

बीड - बीडमध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात शेतजमिनीच्या वादातुन जिवीताला धोका असल्याची तक्रार दिल्यानंतर देखील त्यात वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही हा पोलीसांचा प्रतिबंधक कारवाईतील अक्षम्य नाकर्तेपणा असल्याचे सांगत पोलीस अधिक्षकांनी बीड शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह एका जमादारास निलंबित केले .

बीडमध्ये शेतीच्या वादातुन शनिवारी तिन सख्ख्या भावांची हत्या झाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात शुक्रवारीच (दि. २६) दोन्ही गटांनी बीड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या होत्या. मात्र शहर पोलीसांनी यात प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. प्रतिबंधक कारवाईतील हा अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचे सांगत बीड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड आणि जमादार राजेभाऊ वंजारे यांना निलंबित करण्यात आले.

X
COMMENT