आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्‍ये महिलेची तब्‍बल पाचव्‍यांदा सीझेरीयन डिलीव्‍हरी; बाळ, बाळंतीण दोघेही सुखरूप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - येथील जिल्‍हा रूग्‍णालयात एका 40 वर्षीय महिलेची तब्‍बल पाचव्‍यांदा सीझेरीयन डिलीव्‍हरी करण्‍यात आली. पाचव्‍यांदा सीझर करण्‍याचे प्रमाण अत्‍यल्‍प असून ही शस्‍त्रक्रिया प्रचंड गुंतागुंतीची असते. बीड जिल्‍हा रूग्‍णालयात प्रथमच अशी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. डॉ. अशोक थोरात यांनी यशस्‍वीरीत्‍या ही शस्‍त्रक्रिया केली.  


गेवराई तालुक्‍यातील चकलांबा येथे नाझमीन मिनाज कादरी या चाळीस वर्षीय महिलेवर यापूर्वीही चार सिझर झालेले होते. चार वेळा शस्त्रक्रिया झालेल्या असल्याने त्‍यांच्‍या पोटात गुंतागुंत होती. त्यामुळे त्‍यांच्‍यावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाही करता आली नव्हती. पाचव्यांदा गरोदर राहिल्‍याने महिला औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय गर्भपातासाठी गेली होती. मात्र गुंतागुंतीची शक्यता असल्याने तेथे वैद्यकीय गर्भपात होऊ शकला नाही.


रविवारी चकलांबा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल मुळे यांनी महिलेची तपासणी केली व याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय कदम यांना कळवले. डॉ संजय कदम यांनी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांना माहिती दिली. त्‍यानंतर डॉ अशोक थोरात यांनी तात्‍काळ महिलेस अॅम्‍बुलन्‍सद्वारे जिल्‍हा रूग्‍णालयात आणले. पाचवे सिझर असल्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. अशोक थोरात यांनी स्वतः महिलेचे सिझर व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली. सध्‍या बाळ व बाळंतीण सुखरूप आहेत.

 

पाचव्यांदा सिझर करण्‍याचे प्रमाण अत्यल्प असून अशा शस्त्रक्रिया केवळ वैद्यकीय महाविद्यालयात केल्‍या जातात.  या शस्‍त्रक्रियेत डॉ. अशोक थोरात यांना डॉ. माजेद शेख, डॉ. राजश्री शिंदे, डॉ. सदाशिव राऊत व डॉ परमेश्वर डोंगरे यांनी सहकार्य केले. भूलतज्ञ म्हणून डॉ. श्रीकांत मोराळे, डॉ. अर्जुन तांदळे, डॉ. अविनाश ठोंबरे तर बालरोगतज्ञ म्हणून डॉ. कौशल्या शिंदे यांनी काम पहिले.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...