आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव : जास्त बिअर सेवनाने मुतखडा शरीराबाहेर पडत नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिअर सेवन केल्यावर शरीर किंवा मूत्रपिंडातील खडे बाहेर पडतात, असे समजले जाते. पण यात फार तथ्य नाही. खरे तर बिअर सेवन केल्याने खडे शरीराबाहेर निघत नाहीत. शरीरातून असे खडे बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. बिअर प्यायल्याने मूत्रपिंडावर ताण येतो. लघवीचे प्रमाण जास्त होऊन त्यातच खडे बाहेर निघतात, असा दावा अनेक जण करतात. पण मुतखडा असलेले लोक खूप बिअर पिऊ लागतात आणि त्याचे इतर दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात. 


बिअर सेवन केल्याने लघवी जास्त प्रमाणात होते. हळूहळू शरीरातील पाणी कमी होते. परिणामी लघवीदेखील घट्ट होऊ लागते. बिअरमध्ये ऑक्सलेट असते. हा घटक मुतखडा होण्याचे एक कारण आहे. आरजी स्टोन युरोलॉजीचे डॉ. प्रकाश जोशी म्हणतात, जास्त प्रमाणात बिअर प्यायल्याने युरिनमध्ये लघवीतील आम्लाचे प्रमाण वाढते. अनेक दिवस असे सेवन केले तर आम्लाचे प्रमाण वाढून त्याचे खडे बनतात. 


अनेकदा हार्टबर्नची स्थितीदेखील उद्भवते. कारण बिअरमध्ये गॅस्ट्रिक अॅसिड असते. बिअरमध्ये ४ मिलिमीटर आकाराचे खडे आढळल्याचे प्रकारही उघडकीस आलेले आहे. पण अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही. 


मुतखड्याची कारणे : शरीरात खडे असण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात कॅल्शियमचे प्रमाण. मीठ किंवा इतर क्षार परस्परांच्या संपर्कात येतात, तेव्हा ते गोळा होऊ खडे तयार होतात. त्याला किडनी स्टोन म्हणतात. म्हणजेच मूत्रपिंडातील खडे हे कॅल्शियम, ऑक्सलेट तसेच कॅल्शियम फॉस्फेटपासून बनतात. 

बातम्या आणखी आहेत...