आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीटच्या सेवनाने वाढेल रक्त, राहील रक्तदाबावर नियंत्रण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. बीटचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी बीट खूपच गरजेचे आहे. रोजच्या जेवणात बीट खाणे फायदेशीर ठरते. याचे फायदे जाणून घेऊया. 

रक्तदाब नियंत्रण 
सध्या रक्तदाबाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे बीट खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. गाजर आणि बीटचा एक कप रस प्यायल्याने याचा मोठा फायदा होतो. रक्तदाब असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला हवे. 

रक्ताची कमतरता 
वाढत्या दगदगीमुळे पौष्टिक खाण्याकडे लक्ष नसते. त्यामुळे अनेक त्रास उद्भवू शकतात. रोज सकाळी १ कप बीटचा रस प्यायल्याने त्याचा खूप मोठा फायदा होतो. यामुळे किडनी स्टोनची समस्यादेखील दूर होते. रोज बीट खाल्ल्यामुळे लिव्हरची सूजदेखील कमी होते. 

कफाचा त्रास 
पाऊस, थंडीमुळे अनेकांना कणकण जाणवते. त्यात सर्दी, कफ यांसारखे त्रास होतात. बीटमुळे कफ होण्याची समस्या दूर होते. बीट श्वसननलिका स्वच्छ ठेवते. बीटच्या रसामध्ये मध टाकून शरीरावर खाज येते त्या ठिकाणी लावल्याने ही समस्या दूर होते. बीट आणि साखर खाल्ल्याने कफ पातळ होण्यास मदत होते. 

गॅसची समस्या 
बदलत्या वातावरणामुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे गॅसचा त्रास उद्भवतो. दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. बीट रोज खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. 

सांधेदुखीवर परिणामकारक 
बीटमध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर, क्लोरीन, आयोडिन, आयर्न, व्हिटॅमिन बी 1, बी 2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. बीटमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे लठ्ठपणा वगैरे येत नाही. 

महिलांसाठी लाभदायक 
बीटमुळे महिलांना ऊर्जा मिळते. मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि या वेळी त्रास होत असेल तर बीट खाल्ल्याने त्यापासून सुटका होते. बीटमध्ये फॉलिक अॅसिड असते, जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असते. रक्त वाढवण्यात बीट फायदेशीर ठरते. बीटमुळे दूध वाढते. गर्भवती महिलांना बीट फार फायदेशीर आहे.

बातम्या आणखी आहेत...