आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Before Cutting The Umbilical Cord, The Doctor Stared At The Sharp Eye Of The Newborn

नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा संतप्त चेहरा पाहून डॉक्टर हैराण, म्हणाले- यापूर्वी असे कधीच पाहिले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राझील येथे रियो डी जेनेरियोच्या एका रुग्णालयात 13 फेब्रुवारी रोजी या मुलीचा जन्म झाला
  • गर्भनाळ कापण्यापूर्वी तिने डॉक्टरांकडे रागाने पाहिले, डॉक्टर म्हणाले - हा एक चांगला क्षण होता

रियो डी जेनेरियो - नवजात मुलांचा जन्म झाल्यानंतर मुलं निरोगी आहे आणि त्याचे फुफ्फुसे व्यवस्थित कार्यरत आहेत हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर जन्मानंतर नवजात बाळांना रडवतात. ब्राझीलमध्ये रियो डी जेनेरियो येथील एका रुग्णालयात 13 फेब्रुवारी एका मुलीचा जन्म झाला. मात्र ती जन्मानंतर ती रडली नाही. डॉक्टरांनी तिची गर्भनाळ कापण्यापूर्वी तिला रडवण्याचा प्रयत्न केला. यावर मुलीने डॉक्टरांकडे रागात पाहिले. या दरम्यान स्टाफने या परिस्थितीचे फोटो घेतले. मुलीच्या चेहऱ्यावर नाराजीची भावना पाहून डॉक्टर हैराण झाले होते. डॉक्टर म्हणाले की, त्यांनी यापूर्वी कधीच एखाद्या नवजात बाळाचे एक्सप्रेशन पाहिले नव्हते. मात्र, गर्भनाळ कापल्यानंतर मुलगी रडू लागली. 




रुग्णालयाकडून मुलीचा फोटो शेअर करण्यात आला. याबाबत डॉक्टर म्हणाले की, तो एक चांगला क्षण होता. पालकांनी तिचे नाव इसाबेल परेरा डी जीसस ठेवले आहे. ऑपरेशनद्वारे या मुलीचा जन्म झाला होता.