आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss च्या घरात करणार फॅमिली प्लानिंग - भारती सिंह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा सीजन 12 सुरु होण्यास फक्त 6 दिवस उरले आहेत. सलमानने नुकत्याच झालेल्या 'बिग बॉस'च्या प्रीमियरवर शोची पहिली कंटेस्टेंट जोडी भारती सिंह आणि हर्ष लिम्बचियाच्या नावाचा खुलासा केला होता. हे दोघंही बिग बॉसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. दोघंही सध्या मुलाखती देत आहेत. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत भारतीला विचारण्यात आले की, तु या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय का घेतला? यावर भारतीने चकीत करणारे उत्तर दिले. हा शो सप्टेंबरपासून सुरु होतोय. 


भारतीने दिले असे उत्तर 
या प्रश्नावर भारती म्हणाली- "हनीमून एन्जॉय केल्यानंतर आम्ही 'खतरो के खिलाडी'शोसाठी अर्जेंटीनाला गेलो होतो. यानंतर भारती हसतच म्हणाली की, आता आम्ही रियलिटी शोमध्येच मुलांची प्लानिंग करण्याचा विचार करतोय." भारती पुढे म्हणाली की, "खतरों के खिलाडीच्या वेळीच मला बिग बॉसची ऑफर मिळाली होती. पण मी म्हणाले होते की, मी परतल्यानंतर निर्णय देईल. ज्यावेळी मला मेकर्सने सांगितले की, यामध्ये फक्त मी नाही तर हर्षही सोबत असेल तेव्हा मी खुप आनंदी झाले." 

 

9 महिन्यांपुर्वी भारतीने हर्षसोबत केले लग्न 
कॉमेडियन भारती सिंहने 3 डिसेंबर, 2017 ला गोव्याच्या मर्कुइश बीच रिजॉर्ट येथे लग्न केले. हर्ष हा भारतीपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. हर्ष अनेक कॉमेडी शोचा रायटर राहिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...