आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1983 मध्ये पुण्यात चार मारेकऱ्यांना एकत्र फाशी देण्यात आली होती, निर्भया प्रकरणात ही दुसरी वेळ असेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात 1976 ते 1977 दरम्यान लुटमारीनंतर 10 लोकांच्या हत्येने प्रत्येकजण दहशतीत होता
  • सिरिअल किलिंग करणारे गुन्हेगार पुण्यातील कॉलेजमध्ये कमर्शियल आर्टचे विद्यार्थी होते
  • दारूची नशा आणि दुचाकीची आवड पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारी जगात पाऊल टाकले होते

पुणे - दिल्ली कोर्टाने निर्भया केसमधील चारही गुन्हेगारांचे डेथ वारंट जारी केले आहे. तसेच चार ही दोषींना एकत्र फासावर लटकवण्यासाठी 22 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. देशा तब्बल 36 वर्षांनंतर एखाद्या प्रकरणात चार आरोपींना एकाच दिवशी फासावर लटकवले जाणार आहे. पुण्यात 10 जणांना लुटल्यानंतर खून करणारे 4 सिरिअल किलर राजेंद्र  जक्कल, दिलीप सुतार, संतराम कनहोजी आणि मुनावर शाह यांना 25 ऑक्टोबर 1983 मध्ये येरवडा सेंट्रल जेलमध्ये फाशी दिली होती. 
पुणे शहरात जानेवारी 1976 ते 1977 दरम्यान 10 जणांची हत्या झाली होती. तेव्हा ही घटना अच्युत जोशी-अभयंकर सिरिअल किलिंग नावाने बातम्यांमध्ये आली होती. आरोपींचा एक साथीदार सुभाष चांडक सरकारी साक्षीदार बनला होता. हे सर्व मारेकरी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात कमर्शियल आर्टचे विद्यार्थी होते. परंतु दारूची नशा आणि दुचाकीची आवड पूर्ण करण्यासाठी त्यांनी गुन्हेगारी जगात पाऊल टाकले होते. 

 

पहिली हत्या - 16 जानेवारी 1976


आरोपींनी आपला वर्गमित्र प्रसाद हेगडेचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता. आरोपी प्रसादला फूस लावून जक्कलच्या टीन शेडमध्ये घेऊन गेले आणि त्याच्या वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहिण्यास सांगितली की, त्याचे स्वखुशीने घर सोडले आहे. यानंतर आरोपींनी प्रसादचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह लोखंडी पेटीत बंद करून एका तलावात फेकला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी प्रसादची चिठ्ठी त्याच्या वडिलांना दिली होती. यानंतर सहा महिन्यांत 9 हत्या केल्या


मारेकऱ्यांनी 31 ऑक्टोबर 1976 ते 23 मार्च 1977 पर्यंत 9 लोकांची हत्या केली होती. या दरम्यान ते लुटमार करण्यासाठी अनेक घरांत घुसले होते. घरातील लोकांचा दोरीने गळा आवळून खून केला आणि किमती सामान घेऊन फरार झाले. या बर्बर हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. लोक भीतीपोटी संध्याकाळी 6 नंतर घराबाहेर पडत नव्हते


सिरिअल किलिंगचा तपास करणारे एसीपी (निवृत्त) शरद अवस्थी सांगतात की, "जेव्हा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा कोर्ट परिसरात लोकांची गर्दी होती." तर दुसरीकडे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रुनवल सांगतात की, एकापाठोपाठ झालेल्या हत्यांमुळे शहरात दहशतीचे वातावरण होते. लोक संध्याकाळी 6 नंतर घरातून बाहेर पडत नव्हते. जेव्हा दोषींवर कोर्टाची सुनावणी सुरू झाली तेव्हा वृत्तपत्रांमध्ये त्याची बातमी मोठ्या प्रमाणात वाचली जात असे.
 

बातम्या आणखी आहेत...